-
पुणे येथील शिलो चर्च परिसरात काल ‘गुड फ्रायडे’ निमित्त ख्रिस्ती धर्माच्या बांधवांनी भगवान येशूच्या जीवनाची संघर्ष कहाणी आणि पटकथा जिवंत देखाव्यातून सादर केली. (सर्व फोटो – Express Photograph by Arul Horizon)
-
भारतामधील ख्रिस्ती बांधव गुड फ्रायडेचा दिवस भगवान येशूच्या स्मरणात घालवतात. त्यांच्या येशूबद्दलच्या असलेल्या श्रद्धा, भावना व्यक्त करतात.
-
येशू ख्रिस्ताला सुळावर चढवले गेले, त्याच्या बलिदानाचा दिवस ख्रिस्ती धर्मगुरूंनी गुड फ्रायडे या नावाने स्मरणात ठेवायला सुरुवात केली.
-
पण असं असलं तरी ‘होली फ्रायडे’, ‘इस्टर फ्रायडे’, ‘ग्रेट फ्रायडे’ या नावानेही हा दिवस ओळखला जातो. -
ख्रिस्ती धर्मग्रंथ ‘बायबल’ नुसार गुड फ्रायडेला ‘उत्तम शुक्रवार’ संबोधण्यात आले आहे. या दिवशी भगवान येशूने आपले जीवन जगाला पापातून मुक्त करण्यासाठी अर्पण केले असं म्हटलेलं आहे.
-
गुड फ्रायडेला येशूने आपले जीवन अर्पण करून प्रेमाचा संदेश दिला. यादिवशी येशूचे अनुयायी चर्चमध्ये एकत्र जमतात आणि येशूच्या प्रेमाची आठवण काढतात तर धर्मगुरू येशूच्या संदेशाचा उपासकांना उपदेश देतात.
-
गुड फ्रायडेला चर्चमध्ये एकत्र जमलेल्या उपासकांना धर्मगुरू उपदेश देतात. भगवान येशूने शेवटच्या क्षणी क्रुसावर बोललेले ७ उद्गार त्यामध्ये समजावले जातात.
-
या उपदेशामध्ये क्षमेचा उद्गार, तारणाचा उद्गार, प्रेमाचा उद्गार, क्लेशाचा उद्गार, दु:ख सहनाचा उद्गार, प्रायश्चिताचा उद्गार आणि परमेश्वराला समर्पित होण्याचा उद्गार यांचा समावेश असतो.
-
येशूला का शिक्षा देण्यात आली होती? येशू हा स्वतःला ईश्वराचा पुत्र मानतो, असा त्याच्यावर आरोप लावला होता. येशू प्रस्थापित धर्माच्या चालीरीती न मानता वागत असल्याचा दावा करण्यात येत होता.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”