-
आज म्हणजेच ९ एप्रिल २०२४ला महाराष्ट्रातील घराघरात मराठी नवीन वर्ष साजरे केले जात आहे.
-
यानिमित्त सगळीकडेच आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
-
आजच्या दिवशी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात शोभायात्रांचे आयोजन केले जाते.
-
नवी मुंबईतही आज खास शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
-
या यात्रेमध्ये काही जणांनी ऐतिहासिक पेहराव करून भूमिका साकारल्या.
-
महिला दुचाकीस्वारांचा एक समुह या यात्रेत महिला सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्याचे दर्शन घडवीत होत्या.
-
तर कोळी बांधवांनीही पारंपारिक नृत्य करत आनंद व्यक्त केला.
-
ढोलताशाच्या आवाजाने परिसर दुमदुमला होता. या ढोलपथकामध्ये महिला व तरुणींचे प्रमाणे सर्वाधिक होते.
-
यावेळी अनेक पौराणिक पात्रांचेही रूप घेण्यात आले होते.
-
लेझिम खेळून या मुलींनी महाराष्ट्राच्या पारंपारिक नृत्याचे दर्शन घडविले.
-
काही लोकांनी ‘मतदान’ असे लिहिलेल्या टोप्या घालून यंदाच्या निवडणुकीत जनतेने १००% मतदान करावे असे आवाहनही केले.
-
(Express photo by Narendra vaskar)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”