-
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाचं नवं गाणं लाँच केलं. (सर्व फोटो सौजन्य-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, फेसबुक पेज)
-
शिवसेना उ.बा.ठा. या पक्षाच्या गाण्याचं लाँचिंग झालं तेव्हा उद्धव ठाकरेंसह, संजय राऊत, दिवाकर रावते, सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
-
बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह मशालीचा सुधारित फोटो या नव्या पोस्टरवर लावण्यात आला आहे.
-
उद्धव ठाकरे यांनी पक्षचिन्ह असलेल्या मशालीतही एक छोटासा बदल केला आहे. त्या बदलासह ही नवी मशाल त्यांनी आज पक्षचिन्ह म्हणून सादर केली.
-
शिवसेना उ.बा.ठा. पक्षाला मशाल हे चिन्ह मिळालं आहे. या मशालीच्या तेजाने आपण भ्रष्ट राजवट आणि जुमलेबाजी खाक करु असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
-
मशाल हे शिवसेना उबाठाला मिळालेलं चिन्ह आहे. या चिन्हात थोडासा बदल करण्यात आला आहे. या बदलासह नवं चिन्ह आज जाहीर करण्यात आलं. याच मशालीचं बटण दाबा असं आवाहन आज उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
-
महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा होतील. जाहीरनामा किंवा वचननामा जो म्हणतात तो देखील आम्ही आणणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लीम लिग वगैरे काहीही म्हणू शकतात कारण जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जींनी मुस्लिम लिगशी युती केली होती. काँग्रेस तेव्हा स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेला पक्ष होता मोदींना ते माहीत आहे त्यामुळे त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या असतील असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
-
आधीच्या मशालीपेक्षा ही मशाल काहीशी वेगळी आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी याबाबत माहिती दिली.

Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा