-
आज १७ एप्रिल रोजी संपूर्ण देशभरात रामनवमीचा सण साजरा झाला. याच निमित्ताने अयोध्येतील राम मंदिरात आज प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्य टिळक सोहळा रंगला. (Photos: @ShriRamTeerth/Twitter)
-
याच खास प्रसंगी मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. (Photos: @ShriRamTeerth/Twitter)
-
यावेळी रामलल्लाच्या बालमूर्तीचा अभिषेक करण्यात आला. (Photos: @ShriRamTeerth/Twitter)
-
त्याचबरोबर रामलल्लाच्या मूर्तीचाही अभिषेक केला असून तिला सुंदर वस्त्र परिधान करून सजवण्यात आले होते. (Photos: @ShriRamTeerth/Twitter)
-
दरम्यान, यावेळी ही मूर्ती अतिशय सुंदर दिसत होती. (Photos: @ShriRamTeerth/Twitter)
-
या सूर्यतिलक सोहळ्याचा क्षण डोळ्यांत साठवून घेण्यासाठी भक्तांनी राम मंदिरात गर्दी केली होती. यावेळी केदार, गजकेसरी, पारिजात, अमला, शुभ, वाशी, सरल, कहल आणि रवियोग हे खास योग तयार झाले होते. या ९ शुभ योगांमध्ये रामाच्या कपाळी सूर्य टिळक करण्यात आला. (Photos: @ShriRamTeerth/Twitter)
-
आजच्या दिवशी सूर्यप्रकाश मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या आरश्यात पडला. तिथून हा प्रकाश परावर्तित होऊन पितळेच्या पाइपमध्ये गेला. (Photos: @ShriRamTeerth/Twitter)
-
पितळेच्या या पाईपमध्ये दुसरा आरसा बसवण्यात आला आहे त्यातून सूर्यप्रकाश ९० अंशात पुन्हा परावर्तित झाला. (Photos: @ShriRamTeerth/Twitter)
-
यानंतर पितळेच्या पाईपमधून सूर्यकिरण तीन वेगळ्या लेन्समधून परावर्तित झाले. यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात जो आरसा बसवण्यात आला आहे त्यावर हे सूर्यकिरण पडले. (Photos: @ShriRamTeerth/Twitter)
-
लंबवर्तुळाकार पाईपच्या दुसऱ्या बाजूला लावण्यात आलेल्या आरशातून ही सूर्यकिरणं पुन्हा ९० अंशात परावर्तित झाली. (Photos: @ShriRamTeerth/Twitter)
-
यानंतर गाभाऱ्यातल्या आरशात हे सूर्यकिरण परावर्तित झाले आणि रामलल्लाच्या मूर्तीवर ७५ मिमिचा गोलाकार सूर्यतिलक दिसला. (Photos: @ShriRamTeerth/Twitter)
-
दुपारी १२ वाजता रामललल्लाच्या मूर्तीवर हा सूर्यतिलक सोहळा भाविकांना पाहता आला. सुमारे चार मिनिटांपर्यंत सूर्यतिलक सोहळा रंगला. डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भक्तांनी गर्दी होती. (Photos: @ShriRamTeerth/Twitter)
-
हा सूर्यतिलक सोहळा आजपासून दर रामनवमीच्या दिवशी साजरा होणार आहे. रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून ही पहिलीच रामनवमी आहे. (Photos: @ShriRamTeerth/Twitter)
-
दरम्यान, पीएम मोदी जेव्हा राम ललाच्या सूर्य टिळकांचा अद्भूत क्षण पाहत होते तेव्हा त्यांच्या पायात बूट नव्हते. पीएम मोदींनी त्यांच्या टॅबमध्ये रामललाचे दर्शन घेतले आणि त्यांना नमस्कार केला. (Photos: Narendra Modi/Twitter)
-
मंदिर ट्रस्टने हा सोहळा भक्तांना पाहता यावा म्हणून १०० एलईडी स्क्रिन लावले होते. तर मोदी सरकारने ५० एलईडी स्क्रिन दिले आहेत. एकूण १५० स्क्रिनवर भक्तांना हा सोहळा रांगेत असतानाही पाहता आला. (Photos: @ShriRamTeerth/Twitter)

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल