-
शुष्क वाळवंट असलेल्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये मंगळवारी विक्रमी पाऊस झाला. (Photo: REUTERS/Amr Alfiky)
-
दुबईसह अनेक शहरांमध्ये रस्त्यांवर पाणी साचले होते. (Photo: REUTERS/Amr Alfiky)
-
पुरामध्ये अनेक गाड्या आणि बस अडकून पडल्याचे दुर्मीळ चित्र बघायला मिळाले. (Photo: REUTERS/Amr Alfiky)
-
सोमवारी रात्री दुबई विमानतळ परिसरात पाऊस झाला. (Photo: REUTERS/Amr Alfiky)
-
त्यानंतर मंगळवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी नऊच्या सुमारास जोरदार वादळ आणि पावसाला पुन्हा सुरुवात झाली. (Photo: REUTERS/Rula Rouhana)
-
हा पाऊस दिवसभर कायम होता. (Photo: REUTERS/Amr Alfiky)
-
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरही पूरसदृश स्थिती निर्माण झाली. (Photo: REUTERS/Amr Alfiky)
-
धावपट्ट्यांवर पाणी साचल्याने अत्यंत वर्दळीच्या या विमानतळांवर प्रवाशांना अडकून पडावे लागले. (Photo: REUTERS/Rula Rouhana)
-
१९४९ साली संयुक्त अरब अमिरातींनी पावसाची नोंद ठेवण्यास सुरुवात झाली. (Photo: REUTERS/Amr Alfiky)
-
तेव्हापासून मंगळवारी पडलेला पाऊस हा सर्वाधिक (२४ तासांत १४२ मिमी) असल्याचे डब्ल्यूएएम वृत्तसंस्थेने म्हटले आहे. (Photo: REUTERS/Amr Alfiky)
-
हा पाऊस ‘क्लाउड सीडिंग’मुळे(कृत्रीम पावसाचा प्रयोग) झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Photo: REUTERS/Amr Alfiky)
-
नॅशनल मीटिओरॉजिकल सेंटरच्या हवामान शास्त्रज्ञांनी पावसापूर्वी सहासात तास ‘क्लाउड सीडिंग’च्या विमानांचे उड्डाणे झाल्याची माहिती दिली. (Photo: REUTERS/Rula Rouhana)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”