-
हनुमान गढी, अयोध्या
हनुमान गढी हे अयोध्येतील दहाव्या शतकातील मंदिर आहे. असे मानले जाते की हनुमानजी येथे एका गुहेत राहत होते आणि त्यांनी रामजन्मभूमी किंवा रामकोटचे रक्षण केले होते. मुख्य मंदिरात माँ अंजनीच्या मांडीवर बसलेली बाल हनुमानाची सुंदर मूर्ती आहे. (प्रतीकात्मक फोटो, Photo credit- pixabay) -
प्राचीन हनुमान मंदिर, दिल्ली
कॅनॉट प्लेस, दिल्ली येथे हे एक प्राचीन हनुमान मंदिर आहे. कौरवांशी युद्ध जिंकल्यानंतर पांडवांनी हे मंदिर बांधले होते, असे मानले जाते. येथील हनुमान मुर्ती स्वयंभू म्हणजेच स्वतः प्रकट झालेली आहे. बाल हनुमानाचे मुख दक्षिण दिशेला दिसते. या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने येतात. (प्रतीकात्मक फोटो, Photo credit- pixabay) -
मारघाट हनुमान मंदिर, दिल्ली
मारघाट हनुमान मंदिर हे दिल्लीतील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. हे जमना बाजार हनुमान मंदिर म्हणूनही ओळखले जाते. पौराणिक कथांनुसार, भगवान हनुमान यांनी लक्ष्मणासाठी संजीवनी आणण्यासाठी जात असताना येथे काही काळ विश्रांती घेतली होती. असे मानले जाते की दरवर्षी यमुना नदी येथे हनुमानाच्या दर्शनासाठी येते. (प्रतीकात्मक फोटो, Photo credit- pixabay) -
संकट मोचन हनुमान मंदिर, वाराणसी
मंदिराच्या आत माकडांचा वावर असल्यामुळे हे मंदिर माकड मंदिर म्हणूनही ओळखले जाते. मंदिराची स्थापना गोस्वामी तुलसीदास यांनी केली. या मंदिराचे दर्शन घेणाऱ्याची सर्व समस्या दूर होतात अशी अख्यायीका आहे. या मंदिरात रामाच्या मूर्तीसमोर हनुमानाची मूर्ती आहे. (प्रतीकात्मक फोटो, Photo credit- pixabay) -
बडे हनुमान जी मंदिर, प्रयागराज
बडे हनुमानजी मंदिर प्रयागराजमध्ये आहे. जगातील ही एकमेव मूर्ती आहे जी शयनावस्थेत आहे. हनुमानाच्या मूर्तीची एक बाजू गंगा नदीच्या पाण्यात अर्धी विसर्जित केलेली आहे. ही मूर्ती २० फूट लांब आणि ८ फूट रुंद असून ती सुमारे ६००-७०० वर्षे जुनी असल्याचे सांगितले जाते. (प्रतीकात्मक फोटो, Photo credit- pixabay) -
मेहेंदीपूर बालाजी, राजस्थान
मेहेंदीपूर बालाजी मंदिर हे राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात आहे. हे मंदिर विशेषतः उत्तर भारतातील सर्वात प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे. असे मानले जाते की जे लोक काळ्या जादू आणि दुष्ट आत्म्याने प्रभावित आहेत ते या मंदिराच्या दर्शनाने बरे होतात. (प्रतीकात्मक फोटो, Photo credit- pixabay) -
सालासर हनुमान मंदिर
सालासर धाम हे राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात वसलेले एक महत्त्वाचे मंदिर आहे. दाढी आणि मिशा असलेले हे भारतातील एकमेव हनुमान मंदिर आहे. ही अनोखी हनुमानाची मूर्ती एका शेतकऱ्याला सापडली असल्याचे मानले जाते. येथील मूर्ती आता सोन्याच्या सिंहासनावर ठेवण्यात आली आहे. (प्रतीकात्मक फोटो, Photo credit- pixabay) -
श्री बाला हनुमान मंदिर, जामनगर
बाला हनुमान मंदिर हे श्री बालहनुमान संकीर्तन मंदिर म्हणूनही ओळखले जाते, जे जामनगरमधील रणमल तलावाच्या-लखोटा तलाव दक्षिण-पूर्व बाजूला आहे. भगवान हनुमानाच्या या मंदिराची स्थापना देखील १५४० मध्ये झाली आणि १९६४ पासून येथे राम धुनीचे सतत गायन केले जाते. (प्रतीकात्मक फोटो, Photo credit- pixabay) -
कष्टभंजन हनुमान मंदिर, सालंगपूर गुजरात
येथील भगवान हनुमानाची पूजा ही कष्टभंजन म्हणजेच दु:खांचा विनाश करणारा भगवंत या रूपात केली जाते. या मंदिरात भगवान शनिदेव देखील भगवान हनुमानाच्या चरणी ‘पनोती देवी’या एका स्त्री प्रतिकाच्या रूपात विराजमान आहेत. या मंदिरातील हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सद्गुरु गोपालानंद स्वामींनी केली आहे. (प्रतीकात्मक फोटो, Photo credit- pixabay) -
जाखू मंदिर, हिमाचल प्रदेश
जाखू मंदिर हे भगवान हनुमानाला समर्पित प्राचीन मंदिर आहे. ते समुद्रसपाटीपासून ८ हजार ५४ फूट उंचीवर आहे. येथे टेकडीवर हनुमानाच्या पावलांचे ठसे आहेत. हे मंदिर यक्ष ऋषींनी बांधले होते. हनुमानाच्या दर्शनासाठी येथेही मोठ्या संख्येने भाविक येतात. (प्रतीकात्मक फोटो, Photo credit- pixabay)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ