-
महादेव ऑनलाइन गेमिंग-बेटिंग अॅप संबंधित १५ हजार कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) बॉलीवूड अभिनेता साहिल खान याला रविवारी अटक केली.
-
महादेव अॅपचे द लायन बुक अॅप नावाचे अन्य एक अॅप आहे. हे अॅप दुबईतील हॉटेल व्यावसायिकाशी संबंधित असून साहिल खानची त्याच्याशी भागीदारी आहे.
-
त्याबाबत त्याची चौकशी करण्यात आली होती. ‘एसआयटी’ने साहिल खानची याप्रकरणी तीन वेळा चौकशी केली होती.
-
त्याने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. उच्च न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळल्यानंतर रविवारी एसआयटीने त्याला छत्तीसगड येथून अटक केली.
-
त्यापूर्वी ‘पोलीस चौकशी आणि तपासावर बोलण्याची ही योग्य वेळ नाही. मी लवकरच पत्रकार परिषद घेईन’, असे साहिल खानने सांगितले होते.
-
साहिल खान सातत्याने त्याचे ठिकाण बदलत होता. विशेष तपास पथकाचा एक गट सातत्याने माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे त्याचा माग काढत होता.
-
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये केलेल्या तक्रारीच्या आधारे माटुंगा येथे साहिल खान याच्यासह २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. साहिल खानचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर तो मुंबईतून फरार झाला होता. गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गडचिरोली, छत्तीसगड असा त्याचा सातत्याने पाठलाग केल्यानंतर छत्तीसगडमधील एका हॉटेलमधून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला मुंबईच्या न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने १ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
-
कोण आहे साहिल खान?
साहिल खान हा एक अभिनेता आणि फिटनेस ट्रेनर आहे. ‘स्टाईल’ आणि ‘एक्सक्यूज मी’ सारख्या बॉलिवूड चित्रपटांसाठी तो ओळखला जातो. स्टीरियो नेशनच्या ‘नाचेंगे सारी रात’ या म्युझिकल व्हिडीओने त्यांने आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर तो फिटनेस इंडस्ट्रीकडे वळला आणि फिटनेस ट्रेनर झाला. यासाठी त्याला मुंबईतील अनेक संस्थांकडून पुरस्कारही मिळाले आहेत. -
(सर्व फोटो साहिल खान या फेसबुक खात्यावरुन साभार)
४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी