-
हार्बर मार्गावरून पनवेल ते सीएसएमटी धावणाऱ्या लोकलचा एक डबा आज सकाळी साडे अकराच्या सुमारास सीएसएमटी रेल्वे स्थानकापूर्वी रुळावरून घसरल्याची घटना घडली. (फोटो सौजन्य – एक्सप्रेस फोटो, गणेश शिरसेकर)
-
त्यामुळे या भागातील लोकल सेवा खोळंबली होती. तसेच प्रवाशांमध्ये हाल झाले. (फोटो सौजन्य – एक्सप्रेस फोटो, गणेश शिरसेकर)
-
ही लोकल सकाळी १०.०५ वाजता पनवेलवरून सीएसएमटीच्या दिशेने निघाली होती. (फोटो सौजन्य – एक्सप्रेस फोटो, गणेश शिरसेकर)
-
सीएसएमटी येथे फलाट क्रमांक दोनवर येत असताना एका डब्याचे चाक रुळावरून घसरले. (फोटो सौजन्य – एक्सप्रेस फोटो, गणेश शिरसेकर)
-
यावेळी डब्यात बसलेल्या प्रवाशांना जोरदार झटका बसला. (फोटो सौजन्य – एक्सप्रेस फोटो, गणेश शिरसेकर)
-
त्यामुळे काहीकाळ प्रवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. (फोटो सौजन्य – एक्सप्रेस फोटो, गणेश शिरसेकर)
-
मात्र, ट्रेनच्या वेगावर नियंत्रण मिळवत चालकाला लोकल ट्रेन थांबवण्यात यश मिळाले. (फोटो सौजन्य – एक्सप्रेस फोटो, गणेश शिरसेकर)
-
त्यानंतर अनेक प्रवाशांनी लोकलमधून उड्या मारल्या. (फोटो सौजन्य – एक्सप्रेस फोटो, गणेश शिरसेकर)
-
या घटनेमुळे या मार्गावरील अनेक लोकल या रखडल्या असून याचा डाऊन मार्गावरही परिणाम झाला. (फोटो सौजन्य – एक्सप्रेस फोटो, गणेश शिरसेकर)
-
या घटनेनंतर सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल मस्जिद स्थानकापर्यंत आणल्या जात असून काही लोकल वडाळ्यापर्यंतच आणून पुन्हा परतीचा प्रवासाला निघत आहेत. (फोटो सौजन्य – एक्सप्रेस फोटो, गणेश शिरसेकर)
-
महत्त्वाचे म्हणजे या घटनेनंतर रेल्वे प्रशासन युद्ध पातळीवर काम करत असून दुरुस्तीचे काम वेगात सुरू आहे. (फोटो सौजन्य – एक्सप्रेस फोटो, गणेश शिरसेकर)
-
या दुर्घटनेत कोणताही जिवीतहानी झाली नसून मुख्य मार्गावरही कोणताही परिणाम झाला नसल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – एक्सप्रेस फोटो, गणेश शिरसेकर)

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं