-
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी प्रथमच अयोध्येतील नव्या राममंदिरात जाऊन दर्शन घेतले.
-
यावेळी त्यांनी हनुमानगढीसह अन्य मंदिरांमध्येही पूजा केली.
-
तसेच त्या शरयू आरतीच्या सोहळ्यातही सहभागी झाल्या.
-
तत्पूर्वी अयोध्या विमानतळावर उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी त्यांचे स्वागत केले.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरामध्ये रामल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
-
रामल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर अयोध्येमध्ये भक्त दर्शनासाठी गर्दी करत आहेत.
-
रामलल्लाची मूर्ती कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू/ट्विटर)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”