-
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उन याच्या अनेक सुरस कथा नेहमी समोर येत असतात. आता किम जोंग-उनच्या लैंगिक जीवनाविषयी मोठी माहिती समोर आली आहे.
-
उत्तर कोरियातून पळालेल्या आणि सध्या अमेरिकेत युट्यूबर आणि लेखिका झालेल्या एका मुलीने खळबळजनक दावा केला आहे. येओन्मी पार्क असे या मुलीचे नाव असून तिने केलेला आरोप ऐकून डोकं चक्रावून जाईल.
-
येओन्मी पार्क यांनी सांगितले की, किम जोंग-उन यांच्या आनंदासाठी दरवर्षी २५ सुंदर व्हर्जिन मुलींची भरती केली जाते. मुलींच्या या पथकाला ‘प्लेजर स्कॉड’ असे संबोधले जाते.
-
येओन्मी पार्क लहान असतानाच उत्तर कोरियातून पळून गेली. तिने सांगितले की, या २५ मुलींची भरती करण्यासाठी त्यांची शारीरिक सुंदरता, कुटुंबाची पार्श्वभूमी आणि वैद्यकीय तपासणी केली जाते.
-
येओन्मी पार्क पुढे सांगतात की, प्लेजर स्कॉडसाठी त्यांचीही दोन वेळा प्राथमिक निवड झाली होती. मात्र कौटुंबिक पार्श्वभूमी निकषात न बसल्यामुळे त्यांना अंतिम २५ मध्ये दाखल होता आले नाही.
-
मुलींची भरती करण्यासाठी किम जोंग उनचे अधिकारी शाळांमध्ये नेहमीच दौरे करत असतात. त्यांनी सुंदर मुली हेरल्यानंतर आधी मुलींची कौटुंबिक पार्श्वभूमी तपासली जाते. त्यांचे राजकीय मत काय आहे, याचीही माहिती करून घेतली जाते.
-
जर एखाद्या मुलीचे कुटुंबिय उत्तर कोरियातून पळाले असतील किंवा त्यांचे नातेवाईक दक्षिण कोरियात किंवा अन्य देशांत असतील, अशा मुलींना या स्कॉडमध्ये घेतलं जात नाही.
-
प्लेजर स्कॉड संबंधी अधिक माहिती देताना पार्क म्हणाल्या, मुलींची निवड केल्यानंतर त्यांची कौमार्य चाचणी केली जाते. तसेच इतर वैद्यकीय तपासण्या केल्या जातात. शरीरावर एखादा लहानसा चट्टा जरी असेल तर त्या मुलींना अपात्र ठरविले जाते.
-
प्लेजर स्कॉडमधील मुलींना विविध टास्क दिलेले असतात. त्यांची विभागणी तीन गटात होते. एका गटाला मसाज करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. दुसरा किम जोंग उन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनोरंजन करण्यासाठी तैनात केला जातो. तिसऱ्या गटाला लैंगिक सुखासाठी राखून ठेवले जाते. किम जोंग उन आणि त्यांच्या खास अधिकाऱ्यांना खुश ठेवण्यासाठी हे पथक काम करते.

अंबानींच्या ‘सूर्यतारा’साठी वनमंत्र्यांच्या पायघड्या, गुजरातच्या धर्तीवर राज्यात प्रकल्प