-
लोकसभा निवडणुकीच्या एकूण सात टप्प्यांपैकी चार टप्प्यांमधील मतदान पार पडलं आहे. आता पाचव्या टप्प्यासाठी येत्या २० मे रोजी मतदान होणार आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघामधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
-
उमेदवारी अर्जासह मोदींनी त्यांचं प्रतिज्ञापत्रदेखील सादर केलं आहे, ज्यामध्ये त्यांच्या संपत्तीविषयीची माहिती देण्यात आली आहे.
-
पंतप्रधान मोदींची एकूण संपत्ती ३.०२ कोटींची असल्याचे आणि त्यांच्याकडे ५२,९२० हजारांची रोकड असल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे समोर आले आहे.
-
त्यांच्याकडे स्वतःचे घर, गाडी, जमीन काहीही नसल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. तसेच मोदींच्या करपात्र उत्पन्नात मागच्यावेळेपेक्षा दुपटीने वाढ झाल्याचेही दिसत आहे.
-
२०१८-१९ च्या प्रतिज्ञापत्रानुसार पंतप्रधान मोदींचे वार्षिक करपात्र उत्पन्न ११ लाख रुपये होते. ते आता २०२२-२३ मध्ये वाढून २३.५ लाख रुपये इतके झाले आहे.
-
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मोदींनी २.८५ कोटींचे फिक्स डिपॉझिट ठेवले आहे. तसेच ९.१२ लाख रुपये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र या योजनेत गुंतवले आहेत.
-
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही सरकारची योजना असून भारतीय पोस्टाद्वारे चालविली जाते. या योजनेत वर्षाला ७.७ टक्क्यांचे व्याज मिळते. तसेच व्याजातून मिळणारे उत्पन्न हे ८०सी नुसार करमुक्त असते. एफडी आणि पोस्ट अशी मिळून मोदींची ३ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे.
-
पंतप्रधान मोदींनी २०१९ साली दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांचे उत्पन्न जाहीर केले होते. त्यावेळी त्यांनी पोस्टाच्या योजनेत ७.६१ लाख तर बँकेत फिक्स डिपॉझिटद्वारे १.२८ कोटी रुपये ठेवले होते.
-
तसेच त्यांनी २० हजार रुपये एल अँड टी इन्फ्रस्ट्रक्चर बाँडमध्ये गुंतविल्याचे दाखविले होते. यंदा मात्र त्यांनी बाँडमध्ये कोणतीही गुंतवणूक दाखविली नाही.
-
याशिवाय पंतप्रधानांकडे सोन्याच्या चार अंगठ्या आहेत, ज्याचं वजन ४५ ग्रामच्या आसपास आहे. मोदींच्या अंगठ्यांची किंमत २,६७,७५० रुपये आहे. ही संपूर्ण माहिती पंतप्रधानांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे.
-
गेल्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकूण संपत्तीमध्ये जवळपास ५१ लाखांची वाढ झाली आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मासिक पगाराबाबत बोलायचे झाले तर त्यांना दर महिन्याला २ लाख इतके वेतन मिळते. या वेतनामध्ये मूळ वेतन, दैनिक भत्ता, खासदार भत्ता आणि इतर अनेक भत्ते समाविष्ट आहेत. (All Photos: Narendra Modi/Instagram)

गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘पहलगामच्या घटनेचे…’