-
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातील अखेरच्या टप्यात मुंबईतील सहा मतदारसंघांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, दिंडोरी आणि धुळे या १३ मतदारसंघांत आज, सोमवारी मतदान होत आहे.
-
तीव्र उकाड्यामुळे हैराण झालेल्या मतदारांना बाहेर काढण्याचे आव्हान राजकीय पक्षांसमोर आहे.
-
या मतदारसंघांत दोन कोटी ४६ लाख मतदार असून ते २६४ उमेदवारांचे भवितव्य ठरवतील.
-
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सहकुटुंब मतदान केले.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात सहकुटुंब मतदान केले.
-
भाजपा खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आज मुंबईत मतदान केले.
-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सहकुटुंब मतदान केले.
-
माजी खासदार आणि बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी आज मतदान केले.
-
मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अॅड्. आशीष शेलार यांनी आज मतदान केले.
-
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी आज सहकुटुंब मतदान केले.
-
उत्तर मुंबई मतदारसंघातील भाजप उमेदवार पियूष गोयल यांनी आज मतदान केले.
-
मुंबई उत्तर- मध्यच्या काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांनी आज मतदान केले.
-
(सर्व फोटो सौजन्य : ANI/Twitter | Express Photos)

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी