-
सध्या पुणे पोर्श कार अपघात प्रकरणाची चर्चा देशभर सुरू आहे. रोज नवीन घटना, घडामोडी, खुलासे याप्रकरणी समोर येत आहेत. (Express Photo by pavan Khengre)
-
पुण्यातील पोर्श कारच्या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने देशाचे लक्ष वेधले आहे. यातील अल्पवयीन आरोपीसाठी बाल न्याय मंडळाच्या आधीच्या जामीनापासून ते पुण्यातील आमदाराच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन भेट घेण्यापर्यंत सर्व माहिती जाणून घेऊयात. (Express Photo by pavan Khengre)
-
या प्रकरणाची सुरुवात झाली ती १९ मे रोजी. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याच्या पोर्श या लक्झरी कारने दुचाकी चालवत असलेल्या दोघांना जोरदार धडक दिली, त्यात दोघांचाही मृत्यू झाला. पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार या अपघातावेळी हा अल्पवयीन तरुण मद्यधुंद अवस्थेत होता. त्यानंतर आरोपीला अटक झाली परंतु फक्त १५ तासात त्याला जमीन मंजूर करण्यात आला. या दोन निरपराधांचा बळी घेण्यास कारणीभूत ठरलेल्या आरोपीला निव्वळ अल्पवयीन असल्याच्या कारणास्तव ३०० शब्दांचा निबंध लिहून जामीन कसा काय दिला जाऊ शकतो, अशी चर्चा समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर सुरू होती. (Express Photo by pavan Khengre)
-
ही घटना झाल्यानंतर मृतकाच्या मित्राने एफआयआर दाखल करण्यासाठी धाव घेतली त्यानंतर ही घटना पहिल्यांदा समोर आली. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीत अनिश अवधिया आणि आश्विनी कोष्टा अशी दोघा मृत्यू झालेल्या पीडितांची नावे आहेत. दोघेही मध्यप्रदेशमधील रहिवासी होते. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले अनिश आणि अश्विनी पुण्यात जॉब करत होते. अनिशचा मित्र अकिब मुल्ला याने येरवडा पोलिस ठाण्यात पोर्शे कार अपघाताबाबत प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला. (Express Photo by pavan Khengre)
-
सीसीटीव्ही कॅमेरामधून समोर आली माहिती
पोर्शे कार अंदाजे १६० किमी/ताशी या वेगात असल्याची, अल्पवयीन तरुण गाडी चालवत असल्याची आणि पीडितांच्या दुचाकीवर जाऊन आदळल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत असून पुढील तपास सुरु आहे अशी माहिती २० मे रोजी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. (Photo- Indian Express) -
त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पवयीन मुलाला मिळालेल्या जामीनावर आश्चर्य व्यक्त केले होते. (Photo- Indian Express)
-
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन आरोपीने त्यांना सांगितले की तो दारू पितो हे त्याच्या वडिलांना माहिती आहे. पोलिसांकडे आरोपीचे आणखीन काही सीसीटीव्ही फुटेज आहेत ज्यामध्ये तो शनिवारी उशिरापर्यंत मित्रांसह मद्यप्राशन करत असल्याचे दिसत आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली. (Photo- Indian Express)
-
पुढे २१ मे या दिवशी पुणे पोलीसांकडून अल्पवयीन मुलाला दारू पिऊन पोर्श कार चालवण्याची परवानगी दिल्याबद्दल बाल न्याय कायद्याच्या कलम ७५ आणि ७७ अंतर्गत आरोपीच्या वडिलांना अटक करण्यात आली. याशिवाय पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला परवान्याशिवाय वाहन चालविण्यास परवानगी देण्यासाठी मोटार वाहन कायद्यातील तरतुदी लागू केल्या आहेत.न्यायालयाने आरोपीच्या वडिलांना २४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Photo- Indian Express)
-
पीडितांच्या मित्राने सांगितलं त्यांच्या सर्व मित्रांनी मिळून काही दिवस एकमेकांना पाहिले नव्हते म्हणून पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील एका हॉटेलवर एकत्र जेवणाचा निर्णय घेतला होता.”आम्ही रात्री सर्वजण भेटलो आणि हॉटेलला पोहोचलो. अपघात झाला तेव्हा आम्ही परत जात होतो. परंतु काही कळायच्या आत हा अपघात झाला.” अशा शब्दात २४ वर्षीय अकीबने झालेला दुखद घटनाक्रम सांगितला. (Express Photo by pavan Khengre)
-
दरम्यान, याप्रकरणात घटना घडून गेल्यानंतर रात्री उशिरा एका तासात आमदार सुनील टिंगरे यांनी पोलिस स्टेशनला भेट दिली. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. पोलिसांवर कोणताही दबाव टाकण्यासाठी मी गेलो नसल्याचे आमदार टिंगरे यांनी सांगितलं. (Express Photo by pavan Khengre)
-
अल्पवयीन आरोपीच्या रक्तातील अल्कोहोल चाचणीसाठी उशीर झाल्याचं समोर आले होते, सकाळी ९ वाजता ससून रुग्णालयात मुलाला तपासणीसाठी नेण्यात आले आणि तपासणीसाठी रक्त ११ च्या सुमारास घेण्यात आले. उशीर का झाला? याचे कारण शोधत असल्याचे पोलीसांनी सांगितले. (Express Photo by pavan Khengre)
-
आरोपीला आधी मिळालेला आणि त्यानंतर रद्द झालेला जामीन याबाबत पोलिसांवर कोणता दबाव आहे का असा प्रश्न उपस्थित होत असताना पोलिस आयुक्तांनी मात्र त्यास साफ नकार दिला आहे. ते म्हणाले “आमच्यावर कोणताही दबाव नाही. त्याचा प्रश्नच नाही. आम्ही आरोपीवर कठोर कलम लावले आहेत. आयपीसी कलम ३०४ लागू केले आहे.जे कलम मनुष्यवधाशी संबंधित आहे,” पोलीस आयुक्तांनी इंडियन एक्सप्रेसला ही माहित दिली आहे. (Express Photo by pavan Khengre)
-
आरोपीला त्वरित जमीन मंजूर झाल्यानंतर लोकांनी आक्षेप घ्यायला सुरवात केली होती. त्यानंतर २२ मे रोजी १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाला जामीन रद्द करून ५ जूनपर्यंत बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. सोशल मीडियासह पुणे आणि राज्यभरातून पोर्श अपघात प्रकरणावर जेव्हा संतप्त पडसाद उमटले त्यानंतर दोन जणांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाची रवानगी १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. (Photo- Indian Express)
-
दरम्यान या घटनेनंतर रोज नवीन घटना घडत आहेत. ज्यामध्ये विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. (Express Photo by pavan Khengre)
-
२३ मे रोजी एक कथित व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात अल्पवयीन मुलगा अपघाताबाबत रॅप गाणं गातो आहे आणि शिव्या देतो आहे असं दिसलं. ज्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा त्याच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. त्यानंतर आता या मुलाच्या आईने सदर व्हिडीओ खोटा असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. (Express Photo by pavan Khengre)
-
काय म्हटलं आहे अल्पवयीन मुलाच्या आईने?
“नमस्कार मी शिवानी अग्रवाल. अल्पवयीन आरोपीची मी आई आहे. मी मीडियाला विनंती करते की व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा माझ्या मुलाचा नाही. तो फेक व्हिडिओ आहे हे कृपा करुन लक्षात घ्या. माझा मुलगा बालसुधारगृहात आहे. मी पोलीस आयुक्तांना विनंती करते की कृपा करुन त्याच्या सुरक्षेची काळजी घ्या. प्लीज, प्लीज, प्लीज.” असं त्या म्हणताना दिसत आहेत. (Photo- Indian Express)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल