-
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आज ५८ जागांवर मतदान होत आहे. राजधानी दिल्लीतील सातही जागांवर मतदान सुरू आहे. यापैकी ३ जागांवर काँग्रेस रिंगणात आहे. (पीटीआय फोटो)
-
अशा स्थितीत आज राष्ट्रपतींपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्व पक्ष आणि विरोधी पक्षाचे नेते मतदान करत आहेत. आज रॉबर्ट वाड्रा आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची मुलं रेहान राजीव वाड्रा आणि मिराया वाड्रा हे देखील मतदान करण्यासाठी दिल्लीतील एका मतदान केंद्रावर पोहोचले. (पीटीआय फोटो)
-
प्रियंका गांधी यांच्या दोन्ही मुलांनी पहिल्यांदाच मतदान केले आहे. पहिल्यांदाच मतदान केल्यानंतर दोन्ही भाऊ-बहीण अतिशय आनंदी दिसत होते. हे दोघेही त्यांचे वडील रॉबर्ट वाड्रा, आई प्रियांका गांधी आणि मामा राहुल गांधी यांच्यासह मतदानासाठी आले होते. (पीटीआय फोटो)
-
मिरायाने सांगितलं की ती कॉलेजमधून फक्त मतदान करण्यासाठी आली आहे. सर्वांनी घराबाहेर पडून मतदान करावे, असं आवाहन तिने केलं. संविधान वाचवण्यासाठी आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सर्व तरुणांना मतदान करण्याचे आवाहन रेहानने केले. (पीटीआय फोटो)
-
मिराया रेहानपेक्षा एक वर्षांनी लहान आहे. रेहान २३ वर्षांचा आहे, तर मिराया २२ वर्षांची होणार आहे. प्रियांका गांधींची दोन्ही मुलं मीडियापासून दूर राहतात. दोघेही क्वचितच बाहेर पडताना दिसतात. (पीटीआय फोटो)
-
प्रियांका गांधींची दोन्ही मुलं सध्या राजकारणापासून दूर आहेत. मात्र, दोघेही त्यांचे मामा राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते, त्यानंतर ते चर्चेत आले होते. (फोटो स्रोत: @vadramiraya/instagram)
-
रेहानने दून स्कूलमधून, तर मिरायाने डेहराडूनच्या वेल्हम स्कूलमध्ये शिक्षण घेतलंय. याशिवाय प्रियांकाच्या दोन्ही मुलांना खेळात खूप रस आहे. क्रीडाप्रेमी मिराया बास्केटबॉल खेळाडू आहे. तर रेहानला फोटोग्राफीची खूप आवड आहे. (फोटो स्रोत: @raihanrvadra/instagram)
-
अनेक वेळा प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा देखील मिरायाच्या स्पर्धांसाठी तिच्याबरोबर जातात. मिराया २०१६ साली चर्चेत आली होती, त्यावर्षी तिने बास्केटबॉल चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता. (पीटीआय फोटो)
-
मिराया आणि रेहान यांना निसर्गारम्य ठिकाणांची आवड आहे. रेहान वाइल्डलाइफ फोटोग्राफर देखील आहे. त्याला लहानपणापासूनच या क्षेत्राची आवड होती. याशिवाय रेहान व्हिज्युअल आर्टिस्ट आणि क्युरेटर देखील आहे. (फोटो स्रोत: @vadramiraya/instagram)

असा अपघात कोणाच्याच नशिबी येऊ नये! हायवेवर ओव्हरटेक करायला गेला अन् क्षणार्धात झाला कारचा चुरा, थरारक VIDEO व्हायरल