-
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि देशाचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर-अब्दोल्लाहिया यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर १९ मे रोजी अझरबैजानमध्ये कोसळले. (Photo- Reuters)
-
दाट धुक्याच्या सावटात उड्डाण घेतलेले हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे कोसळले अशी माहिती इराणी वृत्तसंस्थांनी दिली. अमेरिकन बनावटीचे असलेले हेलिकॉप्टर इराण ते अझरबैजानमध्ये या सीमेत उड्डाण करत होते, परंतु काही वेळानंतर ते दिसेनासे झाले. (Photo- Reuters)
-
पूर्व अझाबैझान प्रांतात किझ-कलासी या धरणाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी जात असताना ही घटना घडली. हा कार्यक्रम इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी आणि अझरबैजानचे अध्यक्ष इल्हाम अलीयेव या दोघांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार होता. (Photo- Reuters)
-
अपघाताची माहिती समजताच बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच इराणी सैन्याचे सर्व संसाधनं बचाव कार्यात वापरण्यात आली. (Photo- Reuters)
-
इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या इतर लोकांमध्ये इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर, इतर अधिकारी आणि अंगरक्षकांचा समावेश होता. (Photo- Reuters)
-
इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या अपघातानंतर इराणी नागरिकांनी प्रार्थना केली. (Photo- Reuters)
-
या घटनेवर इराणच्या शेजारी देशांनी चिंता व्यक्त केली आणि बचाव कार्यातही सर्वोतपरी मदत करण्यासाठी पुढे आले. स्थानिकांनी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासाठी प्रार्थना केली. (Photo- Reuters)
-
एकीकडे लोकांच्या प्रार्थना सुरु होत्या तर दुसरीकडे इराणमधील एका टीव्ही चॅनलने बचाव कार्याचे थेट प्रसारण दाखवले. देशातील अंतर्गत विरोधावर कट्टर भूमिका घेणारे आणि जागतिक आण्विक निर्मितीच्या चर्चेत सहभागी होणारे धर्मगुरू अशी इब्राहिम रईसी यांची ओळख आहे. (Photo- Reuters)
-
दरम्यान, रईसी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतामध्ये (२१ मे) राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात आला. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी इराणच्या दूतावासाला भेट देऊन अध्यक्ष रईसी, परराष्ट्रमंत्री अब्दुल्लाहिया यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. (Photo- Reuters)
६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?