-
देशात लोकसभा निवडणुकीचे मतदान सात टप्प्यात होणार असल्याचे निवडणूक आयोगाने नियोजन पत्रकार परिषदेमध्ये केले होते.
-
त्यानुसार १९ एप्रिल पासून पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली. त्यानंतर २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे, असे मतदानाचे एकूण सहा टप्पे पार पडले आहेत.
-
लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याची तारीख १ जून आहे. त्यानंतर निकालाची प्रतिक्षा असेल. या सर्व टप्प्यांतील मतदानाची मतमोजणी ४ जून रोजी करून निकाल जाहीर केले जातील.
-
अशातच महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडले आहे. एकूण पाच टप्प्यात राज्यात मतदान पूर्ण झाले. २० मे रोजी शेवटचं मतदान झालं.
-
दरम्यान यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध आता लागले आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ संपण्यासाठी काहीच महिने शिल्लक आहेत.
-
महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर या दिवशी संपणार आहे. हरियाणा राज्यातील विधानसभेची मुदतही ३ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळं या दोन राज्यातील विधानसभा निवडणुकीचे नियोजन निवडणूक आयोग लवकरच जाहीर करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
-
विधानसभेची मुदत संपण्याआधी किंवा त्या तारखेच्या दुसऱ्या दिवशी नवी विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे असते.
-
या नियमानुसार महाराष्ट्रात आणि हरियाणात दिवाळीपूर्वी किंवा ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात नवीन विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे.
-
महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा निवडणूक २००९ पासून एकाच वेळी होत आहे. दोन्ही विधानसभांची मुदत २३ दिवसांच्या अंतराने संपत असल्यामुळे नियमानुसार एकत्र निवडणूक घेणे आवश्यक आहे.
-
यंदा दिवाळी २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. वास्तविक दिवाळीनंतर राज्यात विधानसभेची निवडणूक घेण्यास बराच कालावधी मिळतो.
-
मात्र हरियाणामुळे महाराष्ट्रातही आधी निवडणूक घ्यावी लागणार आहे. २०१९ मध्ये महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये २१ ऑक्टोबरला मतदान झाले होते. यंदाही याच तारखेच्या आसपास, २१ ते २६ ऑक्टोबरच्या आठवड्यात मतदान होऊ शकेल.
-
(सर्व फोटो- लोकसत्ता संग्रहित) हेही पहा- Cyclone Remal: ‘या’ राज्यांच्या किनारपट्टीवर रेमल चक्रीवादळ दाखल; पंतप्रधान मोदींकडून आढावा
![Devendra Fadnavis on Uddhav Thackeray (1)](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Devendra-Fadnavis-on-Uddhav-Thackeray-1.jpg?w=300&h=200&crop=1)
Devendra Fadnavis : “आमच्यातील संबंध खूप खराब अशी…”, उद्धव ठाकरेंबरोबरच्या संबंधांबाबत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका!