-
कोस्टल रोड प्रकल्पातील काम सुरु आलेल्या एका ठिकाणावरून पाणी झिरपत असल्याची घटना घडली होती. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (२८ मे) त्याठिकाणी जाऊन झिरपणा पाण्याची पाहणी केली. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, झिरपणा पाण्यामुळे बोगद्याला कोणताही धोका नाही, तयार होत असलेला रोड हा वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
तसेच गळतीची माहिती मिळताच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही तातडीने आणि विशेष लक्ष देऊन पाहणी केली आहे, असेही ते म्हणाले. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत यावेळी अभियंता आणि तज्ञांची टीमही उपस्थित होती. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
जिथे गळती झाली आहे तेथील दुरुस्तीसाठी तातडीच्या सूचना दिल्या असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
दुरुस्ती कामादरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नसल्याचेही शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
दरम्यान, महापालिकेने मोठ्या थाटामाटात सागरी किनारा रस्ता प्रकल्पातील एक बाजू ११ मार्च रोजी खुली केली. लवकरच त्याची दक्षिण मार्गिका सुरु करण्यात येणार आहे. चौदा हजार कोटी रुपये खर्च करून पालिकेने हा प्रकल्प सुरु केला आहे. मात्र, पावसाळा सुरु होण्यासाठी काही आठवडे शिल्लक असतानाच बोगद्यांना गळती लागल्याने प्रकल्पातील कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तसेच, या मार्गावरील सुरक्षेबाबतही चर्चांना उधाण आले आहे. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
सोमवारी सायंकाळी बोगद्यांच्या छतावरून पाणी ठिबकत असल्याचे दिसून आले. बोगद्यात ठिकठिकाणी भिंतीवरून पाणी झिरपत होते. बोगद्याच्या सांध्यांमधूनही गळती होत असून भिंतींमध्ये ओलसरपणा पसरला होता. गळती होत असल्याचे समोर येताच पालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बोगद्याची पाहणी केली. (Express Photo By Ganesh Shirsekar)
-
(Express Photo By Ganesh Shirsekar) हे देखील वाचा- PHOTOS : ईशान्य भारताला रेमल चक्रीवादळाचा तडाखा: सोसाट्याचा वारा अन् मुसळधार पावसानं …
![Mesh To Meen Zodiac signs Daily Horoscope In Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Mesh-To-Meen-Zodiac-signs-Daily-Horoscope.jpg?w=300&h=200&crop=1)
६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?