-
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी उत्तरप्रदेशच्या दौऱ्यावर असताना त्यांनी राम मंदिराचे दर्शन घेतले आहे.
-
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतून आराम मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी देवदर्शनाचा दौरा सुरू केला आहे.
-
उद्या होणाऱ्या १ जूनच्या सातव्या टप्प्याच्या मतदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातही मतदान होत आहे.
-
त्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कार्यकर्त्यांशी आणि नेत्यांशी वार्तालाप करण्यासाठी आणि पंतप्रधानांचा प्रचार करण्यासाठी हा दौरा असल्याची चर्चा आहे.
-
या दौऱ्या दरम्यान फडणवीसांनी काशीमधील कालभैरव मंदिरातही दर्शन घेतले.
-
त्यानंतर त्यांनी अयोध्येतील हनुमान गढी येथील भगवान हनुमानाचे दर्शन घेतले.
-
त्यानंतर त्यांनी प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतील मंदिरालाही भेट दिली. तिथे चालू असलेले निर्माण कार्य आणि रामलल्लाचे दर्शनही घेतले.
-
दर्शनानंतर केल्या भावना व्यक्त
-
“अयोध्या धाम येथील श्री रामजन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लाचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले. ५०० वर्षांचा खडतर संघर्ष, अनेक पिढ्यांची प्रतीक्षा आणि त्यागानंतर उभारलेल्या या मंदिराची भव्यता आणि अलौकिकता अनुभवून आज मीही करोडो रामभक्तांप्रमाणे भावूक झालो. यावेळी सर्वांच्या कल्याणासाठी प्रभू श्री रामलल्लास प्रार्थना केली.” अशा शब्दात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
-
त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांचा मेळा होता. दर्शन झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तरं दिली.
-
पत्रकारांनी विचारले की राम मंदिर निर्ममाणातील मराठी माणसाच्या योगदानाबद्दल काय वाटते? यावर फडणवीस म्हणाले, “राम मंदिर निर्माणच्या कार्यात मराठी माणसाचा ही सहभाग असल्याचा मला अभिमान आहे.”
-
पंतप्रधान मोदी कन्याकुमारी येथे ध्यानसाधना करत आहेत तर दुसरीकडे फडणवीस यांनी अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले.
-
(सर्व फोटो देवेंद्र फडणवीस या फेसबुक पेजवरून साभार)

“आमची मान शरमेने खाली…”, तनिशा भिसेंच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मोठा निर्णय; यापुढे डिपॉझिट…