-
लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यातील मतदान झाले आहे आणि उद्या ४ जून रोजी निकाल लागणार आहेत. उद्या देशात कोणाच सरकार बनेल हे ठरणार आहे. एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार मात्र देशात पुन्हा भाजपा सत्तेत येणार असल्याची चर्चा आहे. (Photo- Indian Express)
-
देशातील लोकसभा निवडणुकीतील लक्षवेधी लढती तर खूप आहेत पण त्या सर्व लढतीतील गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघाचीही निवडणूक आहे. इथे भाजपा विरुद्ध काँग्रेस असा थेट मुकाबला होतो आहे. (Photo- Indian Express)
-
भाजपाकडून केंद्रीय मंत्री आणि गृहमंत्री अमित शाह निवडणूक मैदानात उतरले आहेत तर काँग्रेस पक्षांने सोनल पटेल यांना उमेदवारी दिली आहे.दरम्यान, सोनल यांच्यापुढे अमित शाह यांची स्थिती मजबूत दिसत आहे. अशात आपण या दोन्ही उमेदवारांची आर्थिक स्थिती कशी आहे हेही जाणून घेऊया. (Indian Express/Sonal Patel Datta/FB)
-
आर्थिक दृष्टीने विचार केल्यास काँग्रेस उमेदवार सोनल पटेल यांच्या स्थितीची तुलना अमित शाह यांच्या आर्थिक स्थितीशी करता येणार नाही , अशी स्थिती आहे. (Photo- Indian Express)
-
या संकेतस्थळाच्या माहितीनुसार अमित शाह यांची संपत्ती ४० कोटी इतकी असून सोनल पटेल यांची संपत्ती १७ कोटी रुपये इतकी आहे. (Photo- Indian Express)
-
अमित शाह यांनी त्यांच्या संपत्तीचा २१ कोटी रुपयांचा मोठा भाग हा विविध कंपन्या आणि शेअर बाजार अशा ठिकाणी गुंतवला आहे. (Photo- Indian Express)
-
अमित शाह आणि त्यांची पत्नी या दोघांकडे मिळून एकूण ९८ लाख रुप्य्र किंमतीचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने आहेत. या तुलनेत सोनल यांच्याकडे फक्त ६ लाखांचे दागिने आहेत. (Photo- Indian Express)
-
स्थावर मालमत्तेचा विचार केला तर अमित शाह यांच्याकडे १६ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. यामध्ये शेतजमीन, एनए प्लॉट्स, व्यवसाय संकुलं आणि रहिवासी इमारती यांचा समावेश आहे. (Photo- Indian Express)
-
याबद्दल जर आपण सोनल यांचा विचार केला तर, त्यांच्याकडे दिल्ली, अहमदाबाद येथे १६ कोटी रुपये एवढ्या किंमतीची काही घरं आहेत. (Photo- @Sonal Patel Datta/FB)
-
अमित शाह यांच्या नावावर एकही वाहन नाही. तर सोनल यांच्याकडे मात्र हुंडई वरना, टोयोटा इनोवा, महिंद्रा थार, टाटा पंच यासारख्या अनेक गाड्या (वाहन) आहेत. ज्यांची किंमत २९ लाख रुपये इतकी आहे. (Photo- @Sonal Patel Datta/FB)
![Chhaava Box Office Collection Day 1](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Chhaava-Box-Office-Collection-Day-1.jpg?w=300&h=200&crop=1)
Chhaava : ‘छावा’ची ग्रँड ओपनिंग! विकी कौशलच्या सिनेमाने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी