-
पुण्यात माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात काँग्रेसने कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देऊन चुरस निर्माण केली होती.
-
वंचित बहुजन आघाडीनेही माजी नगरसेवक वसंत मोरे आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनने (एमआयएम) माजी नगरसेवक अनिस सुंडके यांना उमेदवारी दिल्याने पुण्यात पहिल्यांदाच पुणे महापालिकेतील चार माजी नगरसेवकांमध्ये चौरंगी लढत बघायला मिळाली.
-
‘वंचित’ आणि ‘एमआयएम’ किती मते घेणार, यावर मोहोळ यांचा भिस्त होता. तर धंगेकर यांच्यामुळे मोहोळ यांचा मार्ग खडतर होणार होता. त्यामुळे धंगेकरांचा ‘कसबा पॅटर्न’ लोकसभेमध्ये चालणार का, याबाबत उत्सुकता होती.
-
दरम्यान, पुण्यातील जनतेचा कौल स्पष्ट झाला आहे. पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ विजयी झाले आहेत.
-
मुरलीधर मोहोळ यांनी रवींद्र धंगेकर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे.
-
महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या मतांची ३५ हजारहून अधिक जाहीर होताच कार्यकर्त्यांनी कोथरूड येथील कार्यालया बाहेर फटाके फोडून, लाडू वाटून आणि गुलाल उधळून जल्लोष केला होता.
-
यावेळी मोहोळ यांना शुभेच्छा देण्यासाठी फुलांच्या माळा तयार लावून सजावट करण्यात आली.
-
तर काही ठिकाणी बॅनर लावून मोहोळ यांना शुभेच्छा देण्यात येत आहे.
-
यावेळी मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
-
दरम्यान, यावेळी पुण्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. तरीही कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला नाही.
-
त्यांनी मोहोळ यांना खांद्यावर उचलून जल्लोष केला. मोहोळ यांच्याही चेहऱ्यावर हा आनंद पाहता येऊ शकतो.
-
Express photograph by Arul Horizon

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO