-
राज्यातील ४८ जागांचे लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. अनेक जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी जनतेचे आभार मानले.
-
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर बारामती लोकसभा मतदार संघातील निवडणूक पवार कुटुंबियांसाठी प्रतिष्ठेची झाली होती. ही निवडणूक अटीतटीची होईल, असा अंदाज सातत्याने वर्तविला जात होता.
-
मात्र मतमोजणीत सुप्रिया सुळे यांनी आघाडी घेतल्याचे चित्र दिसले. त्यामुळे अजित पवार यांना धक्का बसला. बारामती लोकसभा निकालाच्या प्रतिक्षेत असताना सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
-
सुप्रिया सुळे म्हणाल्या, मतदारांचे मी मनपूर्वक आभार मानते. उद्या मी बारामतीला जाणार. संघर्ष! आयुष्यात कधीही खचून जायचं नाही, हे जर कोणाकडून शिकायचं असेल तर माझ्या जीवनातलं सगळ्यात महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय पवार साहेब.
-
ज्या दिवशी हे सगळं घडलं आणि आजचा दिवस हे दहा-अकरा महिने कसे गेले हे माझं मलाच माहिती आहे. आणि त्यातून लोकांनी जी साथ दिली, जो विश्वास दाखवला त्यामुळे जबाबदाऱ्या आमच्या सर्वांच्याच खूप वाढल्या आहेत.
-
सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला वाटतं जबाबदाऱ्या आणि जी काही प्रकरणं या निवडणुकीत झाली आहेत, ती महाराष्ट्राला न शोभणारी आहेत आणि ती आता विधानसभेला होऊ नये. यासाठी आमच्याकडून तर पूर्ण खबरदारी घेतली जाईल.
-
निवडणुकीत असताना महाराष्ट्राची आणबाण आणि शान, संस्कृती ही जपण्याची जबाबदारी सगळ्यांवरच असते. आम्ही या निवडणुकीत ती जपली आणि पुढेही जपू.
-
मला असं वाटतं हे लोकांचं यश आहे. कार्यकर्ते जे आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारे आहेत, आमच्याकडे काही नव्हतं द्यायला तरी कार्यकर्ते पाठीशी राहिले. हे त्यांचं यश आहे.
-
जयंत पाटील यांनी यावेळी म्हटलं, आज धैर्यशील मोहिते पाटील हे मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. आमचे अमर काळे हे वर्ध्यातून विजयी झाले आहेत.
-
अमर काळे हे कमी बोलणारे पण सर्व लोकांना मान्य असलेले उमेदवार आम्ही दिले. तेही विजयी झाले आहेत. आमच्या उमेदवारांना जनतेनं चांगल्या मतांनी विजयी केले आहेत.
-
आम्हाला मनात सल आहे, की सातारचा पराभव आमचा निसटता पराभव आहे कारण पवार साहेबांना मानणारा सातारा जिल्हा आहे. पण थोडासा गहाळपणा झाला व आमची जागा तिथे पराभूत झाली.
-
शशिकांत शिंदे पराभूत झाले याचं दुःख आम्हाला आहे. रावेरमध्ये श्रीराम पाटील नवखे उमेदवार होते त्यांचा पराभव झाला आहे. तरीही महाराष्ट्रातल्या त्या सगळ्याच भागातील जनतेचे मी आभार मानतो. (Express Photo By Ganesh Shirsekar)

डोंबिवलीत ‘हे’ चाललंय काय? भर दुपारी लोकलमध्ये तरुणानं नशेत काय केलं पाहा; VIDEO पाहून धडकी भरेल