-
लोकसभा निवडणुकीतील मतदानाची मतमोजणी झाली आणि कोण विजयी आणि कोण पराजयी हे चित्र स्पष्ट झालं. त्यानंतर भाजपा हा पक्ष देशामध्ये सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला आहे. परंतु देशामध्ये एक असा उमेदवारही आहे ज्याने सर्वात जास्त मतदान मिळवलं आहे आणि याची चर्चा सर्वत्र होत आहे. (PHOTO- PTI)
-
निवडणूक आयोगाने विजयी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे त्या यादीमध्ये एक उमेदवार असाही आहे ज्याला 12 लाख मते मिळाली आहेत. (PHOTO- PTI)
-
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या यादीनुसार देशामध्ये विक्रमी मताधिक्याने विजय प्राप्त करण्याचा बहुमान शंकर ललवाणी या उमेदवाराला मिळाला आहे. (PHOTO- PTI)
-
भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शंकर ललवाणी हे मध्य प्रदेश मधील इंदोर या मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या पेक्षा जास्त मतदान मिळवलं आहे. (PHOTO-Shankar Lalwani/FB)
-
शंकर ललवाणी हे सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले देशातील एकमेव उमेदवार ठरले आहेत. त्यांना १२ लाख २६ हजार ७५१ मतं मिळाली आहेत. तर त्यांनी ११ लाख ७५ हजार ९२ मतांनी विजय मिळवला आहे. (PHOTO-Shankar Lalwani/FB)
-
इंदोर मतदार संघ हा भाजपाचा गड मानला जातो. १९८९ ला माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सर्वात पहिल्यांदा काँग्रेस नेता प्रकाश चंद्रशेठी यांना इथून पराभूत केलं होतं आणि भाजपाच्या तिकिटावर त्या निवडून आल्या होत्या. तेव्हापासून सलग आठ वेळेस या ठिकाणी सुमित्रा महाजन निवडून आल्या होत्या. (PHOTO-Shankar Lalwani/FB)
-
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये इंदोरमधून शंकर ललवाणी यांना भाजपाने मैदानात उतरवलं तेव्हा त्यांना ५ लाख ४७ हजार मतं मिळाली होती. (PHOTO-Shankar Lalwani/FB)
-
लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालात इंदोर या मतदारसंघाच्या नावावर आणखी एक विक्रम तयार झाला आहे, तो म्हणजे या मतदारसंघात सर्वाधिक मतदान नोटालाही झाले आहे. (PHOTO-Shankar Lalwani/FB)
-
इंदोरमध्ये २ लाख १८ हजार ६७४ इतकं मतदान नोटाला झालं आहे. एवढं मतदान आत्तापर्यंत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये कधीही झालेलं नाही. (PHOTO-Shankar Lalwani/FB) हेही वाचा- Lok Sabha Election Result : निकालावर पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाक

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”