-
देशामध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालांना जाहीर होऊन दोन दिवस झाले आहेत.
-
दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये एकमेकांवर जोरदार टीका करताना सर्वच नेते आपल्याला दिसत होते. इंडिया आघाडी आणि एनडीए आघाडी या दोघांमध्ये परस्पर लढाई लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत झालेली आपण पाहिली.
-
दरम्यान निकालांमध्येही त्याचा परिणाम आपल्याला दिसून आला प्रचंड प्रमाणावर चुरशीची लढत होऊन निकालही त्याप्रमाणेच आले आहेत. राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असा संघर्ष झाला.
-
महायुतीच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका झाल्या तर महाविकास आघाडीनेही जशास तसे उत्तर देत त्या टीकांचा सामना केला.
-
दरम्यान मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एक वक्तव्य केलं होतं, ते म्हणाले होते “लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जर १८ जागा मिळाल्या तर मी संन्यास घेईल.” त्यांच्या या वक्तव्यावर निकाल जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार टीका होत आहे. त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली जात आहे.
-
त्यावर आशिष शेलार यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे. आशिष शेलार यांनी त्यांच्याच वक्तव्यावर आता घुमजाव केला आहे. ते म्हणाले “उद्धव ठाकरेही म्हणाले होते की देशामध्ये एनडीए ४०० जागा काय ४० जागाही जिंकणार नाही. आता भाजपाला ४० जागा पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे आता तोंड का लपवत आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे सन्यास घेतील का? ” असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी त्यांच्या वक्तव्यावर घुमजाव केला आहे.
-
महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने १३, शिवसेना ९ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ८ जागांवर मिळविला आहे. महाविकास आघाडीने जिंकलेल्या जागांची बेरीज ३० होते, तर सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी काँग्रेसा पाठिंबा दिल्यास मविआची संख्या ३१ होऊ शकते.
-
दुसरीकडे महायुतीच्या जागा घटल्या आहेत. भाजपाला केवळ ९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर शिवसेना शिंदे गट ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला केवळ एका जागेवर विजय मिळविता आला. महायुतीची बेरीज १७ होते.
![Navagraha Fame Actor Giri Dinesh Passes Away](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Navagraha-Fame-Actor-Giri-Dinesh-Passes-Away.jpg?w=300&h=200&crop=1)
पूजा करताना आला हृदयविकाराचा झटका, ४५ वर्षीय अभिनेत्याचे निधन