-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (६ जून) रोजी ‘एनडीए’तील घटक पक्षांना विश्वासात घेऊन केंद्रातील मोदी ३.० सरकारचा मार्ग सुकर केला.
-
पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानी झालेल्या बैठकीत मोदींची ‘एनडीए’च्या प्रमुखपदी एकमताने नियुक्ती करण्यात आली.
-
या बैठकीमध्ये, केंद्रात सरकार स्थापनेचा दावा तातडीने करण्याची विनंती मोदींना करण्यात आली.
-
‘एनडीए’तील घटक पक्षांच्या नेत्यांनी मोदींना पाठिंब्याचे लेखी पत्रही दिले असून मोदींच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी रविवारी ९ जून रोजी होण्याची शक्यता आहे.
-
नरेंद्र मोदी यंदा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.
-
या शपथविधी सोहळ्याला परदेशी पाहूणे हजेरी लावणार असल्याची चर्चा आहे.
-
सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
-
यामध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना.
-
श्रीलंकेचे राष्ट्राअध्यक्ष रानिल विक्रमसिंघे.
-
नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल.
-
भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे.
-
मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांचा समावेश आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नरेंद्र मोदी / सोशल मीडिया)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच