-
मराठा समाजाच्या ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी ४ जून रोजी उपोषणाला बसण्याची घोषणा केली होती.
-
लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती पोलिसांनी केली होती, अशीही माहिती जरांगेंनी दिली होती.
-
याशिवाय मनोज जरांगे पाटील यांच्या गावामधून म्हणजे अंतरवाली सराटी येथील काही ग्रामस्थांनी उपोषण आंदोलनाला विरोध करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.
-
या आंदोलनामुळे गावातील जातीय सलोखा बिघडत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं, त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण तात्पुरत स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.
-
मनोज जरांगे पाटील यांनी ४ जून रोजीचं उपोषण तात्पुरत स्थगित करत उपोषणाची नवी तारीख घोषित केली होती.
-
८ जून रोजी आपण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती.
-
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या उपोषणाला अंतरवाली सराटीच्या ग्रामस्थांनी विरोध केला होता, त्यानंतर जरांगेंनी गावाबाहेर जाऊन उपोषण करण्याचा निर्णय घेतला. परंतु यासंदर्भात गावकऱ्यांनी जरांगेंची मनधरणी केली आहे, अशीही माहिती त्यांनी दिली असून आता गावामध्येच उपोषण होणार आहे. दरम्यान पोलिसांनी उपोषणाला परवानगी नाकारली असून, जरांगेंनी मात्र आपण उपोषणावर ठाम असून पूर्ण तयारी झाली असल्याचे सांगितलं आहे.
-
त्यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागणीसाठी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आज उपोषणाला बसले आहेत.
-
आज सकाळी १० वाजता या आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे, मेलो तरी चालेल पण मराठा आरक्षण मिळवणारचं असं जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
-
दरम्यान काल सरकारकडून चर्चेसाठी आमदार संजय सिरसाठ यांचा फोन आल्याची माहिती त्यांनी दिली. परंतु मी समाजाशी प्रामाणिक राहणार, बाकीच्या गोष्टी माझ्यासाठी गौण आहेत असं जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.

Hanuman Jayanti 2025 : हनुमानाच्या ‘या’ आहेत चार प्रिय राशी; कमी वयात होतात श्रीमंत, संकटमोचनच्या कृपेने अडचणी होतात दूर