-
लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर खासदार नारायण राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर भेट घेतली आहे.
-
यावेळी नारायण राणे यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव नितेश राणे देखील उपस्थित होते. परंतु यावेळी त्यांनी माध्यमांशी कोणतीही बातचीत केली नाही.
-
राज ठाकरे यांनी नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीत प्रचार सभा घेतली होती, याच संदर्भात त्यांचे आभार मानण्यासाठी नारायण राणे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.
-
राज ठाकरे यांनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची चर्चा देशभर सुरू झाली.
-
राज ठाकरे यांनी प्रत्यक्षरीत्या एकही उमेदवार लोकसभा निवडणुकीत उतरवला नसला तरी त्यांनी महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यामुळे ते या लोकसभा निवडणुकीत चर्चेत राहिले.
-
यावर्षी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकही होणार आहे, त्यासाठी काहीच महिने शिल्लक आहेत. त्यामुळे आता महायुतीमध्ये सामील झालेल्या मनसे आणि इतर पक्ष यांच्यातील जागांच्या वाटाघाटी कशा असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
दरम्यान, नारायण राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून मोठा विजय प्राप्त केला. त्यांना भाजपाने यावेळेस उमेदवारी दिली होती. तर त्यांच्यासमोर उभे असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव झाला आहे.
-
नारायण राणेंना ४ लाख ४८ हजार ५१४ मते मिळाली तर विनायक राऊत यांना ४ लाख ६५६ मते मिळाली एकूण ४७ हजार ६५८ मतांच्या फरकाने विनायक राऊतांचा इथे पराभव झाला आहे.
-
नारायण राणेंनी जरी त्यांची जागा जिंकलेली असली तरी महाराष्ट्रातील इतर मतदारसंघात महायुतीला मोठा फटका बसला आहे.
-
२०१९ मध्ये भाजपाला सर्वाधिक २२ जागा मिळाल्या होत्या, त्या आता ९ जागांवर घसरल्या आहेत. त्यामुळे आता या सर्वांचा विधानसभा निवडणुकीत काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
(सर्व फोटो- नारायण राणे/ राज ठाकरे/ विनायक राऊत, सोशल मीडिया) हेही पहा- Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांचं आमरण उपोषण पुन्हा सुरु; सरकारमधील ‘या’ नेत्याने…

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?