-
आसाममध्ये आलेल्या पूरस्थितीत थोडी सुधारणा झाली आहे. हळू हळू पाणीपातळी घटत आहे. हवामान खात्याच्या ताज्या माहितीनुसार आसामच्या ८ जिल्ह्यामधील ५४ हजार ४६७ लोकांना अजूनही पाण्याने वेढलेले आहे. त्यांचे जीवन धोक्यात आहे. आसाममधील होजाई जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाच्या पाण्याने दळणवळणास अडथळा निर्मास्न झाला आहे. (PTI)
-
आसाममध्ये निर्माण झालेल्या पूरसदृश्य स्थितीमुळे आत्तापर्यंत २५ जणांचा बळी गेला आहे. २८ मे पासून वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनामध्ये एकूण ३४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद झाली आहे. या छायाचित्रात आसामच्या नागाव जिल्ह्यात रेमल चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर झालेल्या पावसानंतर एक स्त्री आणि तिचे मूल पुराने तुडुंब भरलेल्या रस्त्यावरून आपला जीव धोक्यात टाकून चालताना दिसत आहेत. (PTI)
-
दरम्यान, ३० मे रोजी केरळमध्ये दाखल झालेला नैऋत्य मोसमी पाऊस मध्य अरबी समुद्र, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, किनारी आंध्र प्रदेश, मध्य बंगालचा उपसागर आणि वायव्य बंगालच्या उपसागराच्या काही भागाकडे पुढे सरकला आहे. (Express photo by Partha Paul)
-
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा सरासरी पाऊस होणार आहे १९७१ ते २०२० पर्यंतच्या रेकॉर्ड प्रमाणे यंदाही पाऊस होईल ८८०.०६ मिलिमीटर इतका पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. (या फोटोमध्ये परगणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे लोकांच्या घरावर झाडांची पडझड झाली, त्यामधे मदतकार्य करताना एनडीआरएफचे जवान दिसत आहेत.) (PTI)
-
केरळमध्ये मान्सून सुरू होण्याआधीच राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस आणि भूस्खलन झाले होते. तिरुवनंतपुरममध्ये अतिवृष्टीनंतर पूरग्रस्त भागातून अग्निशमन आणि बचाव कर्मचारी एका वृद्ध महिलेला वाचवताना. (PTI)
-
चार महिन्यांच्या मुख्य मान्सून हंगामात देशात ७० टक्क्यांहून अधिक पाऊस पडतो, जून ते सप्टेंबर हा कालावधी पावसाच्या पाण्यावर आधारित खरीप लागवडीसाठी आणि जलाशय आणि धरणे भरण्यासाठी महत्त्वाचा असतो. केरळमधील एर्नाकुलम येथे भर पावसात पाण्याने तुडुंब भरलेल्या रस्त्यावरून वाहने ये-जा करताना. (PTI)
-
२ जून रोजी बंगळुरूमध्ये नैऋत्य मोसमी पावसाने हजेरी लावली. या पावसाने जून महिन्यातील सर्वाधिक दैनंदिन पावसाचा १३३ वर्षांचा विक्रम मोडला. बीबीएमपीने सांगितले की त्यांना २०६ झाडे पडण्याच्या तक्रारी आणि ४१ फांद्या पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. बेंगळुरूमध्ये पावसामुळे एक झाड एका चारचाकीवर उन्मळून पडले यामुळे चारचाकीचे नुकसान झाले.(PTI)
-
नैऋत्य मान्सूनने गुरुवारी महाराष्ट्रातही प्रवेश केला आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावर मान्सूनचे ढग जमलेले येथे पाहायला मिळाले. (Reuters)
-
हवामान खात्याने मुंबई आणि शेजारील ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी १० जूनपर्यंत यलो अलर्ट दिला आहे. मुंबईमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, तर काही ठिकाणी मध्यम मध्यम हलक्या सरी कोसळतील. (Express photo by Ganesh Sirsekar) हेही पहा-PHOTOS : जगातील सर्वात मोठ्या फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांच्या काही आठवणी; ८७…
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच