-
यंदा लोकसभा निवडणूक विविध कारणांनी चर्चेत राहिली आहे.
-
सर्वपक्षीय नेत्यांनी जोरदार प्रचार करून आपले उमेदवार निवडून आणायला पूर्ण ताकद लावल्याचे पाहायला मिळाले.
-
तर काही ठिकाणी उमेदवार असे होते जे त्यांच्या वयामुळे किंवा इतर नेत्यांच्या नातेसंबंधांमुळे चर्चेत आले होते.
-
त्यापैकीच एक नाव शांभवी चौधरी यांचही आहे. त्यांनी लोकसभा निवडणूक २०२४ मधील सर्वात तरुण उमेदवार असाही बहुमान मिळवला होता.
-
आता त्यांनी सर्वात तरुण खासदार अशीही ओळख मिळवली आहे. लोक जनशक्ती पार्टीकडून उमेदवार असलेल्या शांभवी यांनी बिहारमधील समस्तीपूर लोकसभा मतदारसंघातून विजय प्राप्त केला आहे. लोक जनशक्ती पार्टी हा पक्ष सध्या एनडीए आघाडीचा घटक पक्ष आहे,
-
शांभवी चौधरी या मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मंत्री अशोक चौधरी यांच्या कन्या आहेत.
-
शांभवी यांनी लेडी श्रीराम महाविद्यालय दिल्ली येथून अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले आहे तसेच समाजशास्त्र विषयात पीएचडी मिळवली आहे.
-
शांभवी या विवाहित असून त्यांचे पती शायन कुणाल आहेत. २०२२ मध्ये त्यांचे लग्न झाले असून, या लग्न सोहळ्याला मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित होते.
-
शांभवी चौधरी यांचे वय वर्ष २५ आहे. निवडून आलेल्या खासदारांपैकी शांभवी या सर्वात तरुण खासदार ठरल्या आहेत. (Photo Source- Shambhavi Chaudhary/Facebook Page)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच