-
यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर निर्णायक ठरलेला तेलगू देशम हा पक्ष सध्या चर्चेत आहे. काल पार पडलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यात टीडीपी पक्षाचे खासदार राम मोहन नायडू यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ते मोदी सरकारमधील सर्वात तरुण मंत्री ठरले आहेत. वयाच्या छात्तीसाव्या वर्षी त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे.
-
मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्यामध्ये तेलगू देशम पक्षाला दोन मंत्री पद मिळाली आहेत. ज्यामध्ये राममोहन नायडू हे कॅबिनेट मंत्री बनले आहेत. तर चंद्रशेखर पेम्मासानी हे राज्यमंत्री बनले आहेत. राम मोहन नायडू ३६ वर्षांचे आहेत.
-
माजी केंद्रीय मंत्री आणि टीडीपीचे नेते येरन नायडू यांचे चिरंजीव राम मोहन नायडू हे चंद्रबाबू नायडू यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांचे वडील येरन नायडू १९९६ मध्ये सर्वात कमी वयात कॅबिनेट मंत्री झाले होते. राममोहन नायडू हे उच्चशिक्षित आहेत.
-
त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण दिल्लीतील आर के पुरम येथील दिल्ली पब्लिक स्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर ते अमेरिकेत शिक्षणासाठी गेले तिथे त्यांनी पर्ड्यू विद्यापीठामधून इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग ही पदवी घेतली. त्यानंतर राम मोहन नायडू यांनी लॉंग आयलँड येथे गेले आणि एमबीएचे शिक्षण पूर्ण केले.
-
Myneta.info या वेबसाईटच्या माहितीनुसार राम मोहन नायडू यांच्याकडे २३ कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्या नावावर जवळपास २ कोटी ९८ लाख रुपये इतकं कर्ज देखील आहे.
-
राम मोहन नायडू आणि त्यांच्या पत्नीच्या विविध बँक खात्यामध्ये ३ कोटी रुपयांपेक्षाही जास्त रक्कम जमा आहे.
-
याशिवाय त्यांनी विविध कंपन्यांचे बॉण्ड्स, डिबेंचर आणि शेअर बाजारामध्ये १ कोटी रुपयांहून अधिकची गुंतवणूक केली आहे.
-
राम मोहन नायडू यांच्याकडे १ कोटी ५१ लाख ७७ हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आहेत.
-
राम मोहन नायडू आणि त्यांच्या पत्नी यांच्या नावावर जवळपास १६ कोटी रुपये इतक्या किमतीची स्थावर मालमत्ता आहे, ज्यामध्ये शेतजमीन आणि निवासी घरांचा समावेश आहे.
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”