-
काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी (१० जून) बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची नवी दिल्लीत भेट घेतली.
-
यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधीही उपस्थित होत्या.
-
शेख हसीना यांनी खोलीत प्रवेश करताच त्यांनी सोनिया गांधी यांना कडकडून मिठी मारली.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी शेख हसीना शनिवारी दिल्लीत दाखल झाल्या होत्या.
-
त्यानंतर आज त्या सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी थेट त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या. यावेळी त्यांनी जुन्या ऋणानुबंधांना उजाळा दिला.
-
खरं तर शेख हसीना आणि गांधी कुटुंबाचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. इंदिरा गांधी यांनी अनेकदा शेख हसीना यांची मदत केली होती.
-
१९७५ ते १९८१ या सहा वर्षांच्या काळात शेख हसीना या दिल्लीत वास्तव्यास होत्या. दिल्लीतील लजपत नगर-३ या भागात त्या राहत असत.
-
शेख हसीना पहिल्यांदा भारतात आल्या तेव्हा त्या केवळ २८ वर्षांच्या होत्या. १९७५ मध्ये जेव्हा बांगलादेशमध्ये सत्तापालट झाला, तेव्हा शेख हसीना यांचे वडील मुजीब उर रहमान आणि त्यांच्या कुटुंबियांची हत्या करण्यात आली होती.
-
त्यावेळी शेख हसीना या जर्मनीत होत्या. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. त्यानंतर शेख हसीना यांना इंदिरा गांधी यांनी दिल्लीत आश्रय दिला होता. तेव्हा त्या सहा वर्ष दिल्लीत वास्तव्यास होत्या.

हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…