-
दक्षिण कुवेतमधील मंगफ शहरात बुधवारी (१२ जून) पहाटे एका इमारतीला आग लागली, यात अनेक भारतीयांसह किमान ४९ जणांचा मृत्यू झाला आणि ५० हून अधिक जण जखमी झाले. इमारतीमध्ये जवळपास १६० लोक राहत होते, ते सर्व बांधकाम कामगार आहेत. बांधकाम कंपनी एबीटीसी समूहाने ही इमारत आपल्या मजुरांच्या निवाऱ्यासाठी भाड्याने घेतली होती. (PTI)
-
ज्या इमारतीत आग लागली ती बांधकाम कामगारांसाठी वापरली जात होती आणि तिथे मोठ्या प्रमाणात कामगार होते. लागलेल्या भीषण आगीमुळे आणि धुराच्या कचाट्यात सापडल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. (Reuters)
-
कुवेतच्या उप-पंतप्रधानांनी रिअल इस्टेट मालकांवर सुरक्षा नियमांचं उल्लंघन आणि लालसेचा आरोप केला, अशा पद्धतीने सुरक्षेकडे दुर्लक्ष केले गेले असल्यामुळे ही घटना घडल्या असल्याचे त्यांनी सांगितले. (Reuters)
-
प्रशासनाने सांगितले की, दुर्घटना का झाली याचे कारण शोधले जात आहे, तसेच म्र्त्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या नागरिकांची ओळख पटवण्याचे काम सद्ध्या कर्मचारी करत आहेत. (X/@indembkwt)
-
मृतांमध्ये बहुसंख्य केरळ, तामिळनाडू आणि उत्तर भारतीय राज्यांतील भारतीय नागरिक होते. त्यांचे वय २० ते ५० वर्षांच्या दरम्यान आहे. (X/@indembkwt)
-
भारतीय दूतावास अधिकाऱ्यांनी अल-अदान रुग्णालयालाही भेट दिली, जिथे आगीच्या घटनेत जखमी झालेल्या ३० हून अधिक भारतीय कामगारांना दाखल करण्यात आले आहे. (X/@indembkwt)
-
स्थानिक प्रसारमाध्यमांनी आणि घटनेच्या साक्षीदारांनी सांगितले की इमारतीचा खालील भाग जिथून बाहेर पडता आले असते तो बंद होता त्यामुळे एकही पिडीत व्यक्तीला आग लागल्यानंतर बाहेर पडता आले नाही त्यामुळे त्यांचा या भीषण आगीत गुदमरून मृत्यू झाला. (Reuters) हेही पहा- Countries without Indians : जगातील ‘या’ देशांमध्ये एकही भारतीय राहत नाही; एक तर शेजारीच आहे!

हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”