-
बिहारमधील हाजीपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या खासदार चिराग पासवान यांनी राष्ट्रपती भवन येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात चिराग यांना स्थान मिळाले आहे.
-
लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान, त्यांचे वडील कै. रामविलास पासवान यांचा वारसा पुढे नेत आहेत. चिरागचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास कसा राहिला ते जाणून घेऊया.
-
चिराग पासवान यांचे वडील कै. रामविलास पासवान हे केंद्रात मंत्री राहिले आहेत. बिहारच्या राजकारणातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून रामविलास पासवान यांची ओळख आहे. ते बराच काळ काँग्रेसच्या यूपीए आघाडीबरोबर सरकारमध्ये सहभागी होते, परंतु २०१४ नंतर त्यांनी एनडीए आघाडीला पाठींबा दिला.
-
दरम्यान, २०२० मध्ये रामविलास पासवान यांचे निधन झाल्यानंतर, २०२१ मध्ये त्यांचे काका आणि तेव्हाचे हाजीपूरचे खासदार पशुपती पारस यांच्याकडून लोजपा पक्षावर दावा केला गेला. त्या नंतर न्यायालयीन लढाईत पक्ष आणि पक्षाचे चिन्ह (बंगला) पशुपती पारस यांना मिळाले.
-
या सगळ्या घडामोडीनंतर चिराग पासवान यांनी लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) स्थापन केला आणि त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले.
-
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत चिराग यांनी आरजेडीच्या शिवचंद्र राम यांचा १ लाख ७० हजार १०५ मतांनी पराभव केला.
-
त्याआधी बिहारच्याच जमुई मतदारसंघातून ते २०१४ आणि २०१९ ला खासदार म्हणून निवडून आले होते. २०१९ मध्ये चिराग यांनी लोक जनशक्ती पक्षाचे उमेदवार म्हणून जमुई येथून निवडणूक लढवली आणि त्यांचे प्रतिस्पर्धी भूदेव चौधरी यांचा पराभव केला तर २०१४ मध्ये प्रतिस्पर्धी सुधांशू भास्कर यांचा पराभव केला.
-
चिराग यांनी इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले आहे. चिराग पासवान यांनी राजकारणात येण्यापूर्वी बॉलीवूडमध्ये काम केले. त्यांचा मिले ना मिले हम हा चित्रपट २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये त्यांनी कंगना राणौतसोबत काम केले होते. कंगना राणौतही यावर्षी मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून खासदार बनली आहे. संसदेत त्या दोघांची भेट झाल्यावर त्यांनी एकमेकांना अलिंगनही दिले, त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आणि विविध चर्चा रंगल्या. (Photo- Jansatta)
-
२०१० आणि २०११ मध्ये बॉलीवूडमध्ये काम केल्यानंतर त्यांनी अभिनयातून आपला मार्ग बदलला आणि २०१४ पासून लोक जनशक्ती पक्षाचे उमेदवार म्हणून जमुई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून ते पहिल्यांदा खासदार झाले.
-
त्याआधी एनडीए पक्षाची सभागृह नेता निवडीची बैठ झाली. त्यावेळी नरेंद्र मोदी यांची एकमताने निवडही झाली. त्यादरम्यान चिराग पासवान यांनी भाषण केले, त्या भाषणांनंतर पंतप्रधान मोदी यांनी चिराग यांना शाबासकी देत अलिंगन दिले, त्याचीही मोठ्या प्रमाणावर देशात चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले.
-
लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख चिराग पासवान यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. हाजीपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले चिराग पासवान यांनी रविवारी (९ जून) दिल्लीतील राष्ट्रपती भवनात मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीचा घटक पक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली. बिहारमध्ये एकूण ४ जागा लढवून सर्व ४ जागांवर १०० टक्के स्ट्राईक रेटने विजय प्राप्त केला. त्यानंतर त्यांनी मोदी सरकारला पाठींबा दिला आहे, तसेच त्यांना केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रीपदही मिळाले आहे.
-
(सर्व फोटो साभार- चिराग पासवान सोशल मीडिया)

Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे