-
८ जून रोजी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण सुरू केले होते.
-
सहा दिवसांपासून सुरु असलेले जरांगेंचे उपोषण स्थगित करण्यात आले आहे. मागण्या मान्य करण्यासाठी जरांगेंनी एक महिन्याचा वेळ दिला आहे. अन्यथा राजकारणात उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
-
राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने काल १३ जून रोजी मनोज जरांगेंच्या उपोषणावर यशस्वी तोडगा काढला. राज्य सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई, राणा जगजितसिंह आणि खासदार संदिपान भुमरे यांनी अंतरावाली सराटी येथे पोहोचत मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणाबाबत सरकार कशा पद्धतीने काम करत आहे, याबाबतची माहिती त्यांनी मनोज जरांगे यांना दिली.
-
“मला राजकारणात रस नाही, पण राजकारणात येण्यास मला भाग पाडू नका, एका महिन्यात आरक्षण द्या, अन्यथा मी राजकारणात उतरणार, मागण्या मान्य झाल्या नाहीत तर नाव घेऊन उमेदवार पाडू” असा इशारा जरांगेंनी यावेळी दिला.
-
उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झाले. गेल्या ६ दिवसांपासून उपोषण सुरु असल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. महिन्याभरात मागण्या मान्य न केल्यास विधानसभा लढवण्याचा इशारा जरांगेंनी दिला आहे.
-
मनोज जरांगेंनी मराठा आंदोलनात आरक्षणासाठी केलेल्या मागण्या
-
मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण
-
कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगे सोयऱ्यांना प्रमाणपत्र
-
नोंदी नसणाऱ्यांना शपथपत्र घेऊन प्रमाणपत्र मिळावे.
-
आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतिगृह बांधणी झाली पाहिजे.
-
मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी निघेपर्यंत कोणतीही सरकारी भरती नको.
-
भरती केल्यास मराठा समाजाच्या जागा राखीव ठेवा.
-
मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या.
-
एसईबीसी अंतर्गत २०१४ च्या नियुक्तीत त्वरित मिळाल्या पाहिजेत.
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”