-
देशामध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तिसऱ्यांदा एएनडीए आघाडीने देशामध्ये सरकार स्थापन केले.
-
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
-
दरम्यान या लोकसभा निवडणुकीसह आंध्र प्रदेश, सिक्कीम आणि ओडिशा या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकाही झाल्या. त्यापैकी आंध्र प्रदेश राज्यामध्ये एनडीए आघाडीला मोठे यश मिळाले. १७५ जागांपैकी तेलगू देशम या पक्षाने १३५ जागा, जनसेना पक्षाने २१ जागा तर भाजपने ८ जागांवर विजय प्राप्त केला आहे.
-
त्यानंतर १२ जून या दिवशी तेथील मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला नरेंद्र मोदी आणि एनडीए आघाडीतील अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
-
या सोहळ्यामध्ये चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
-
या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही उपस्थित होते.
-
त्यानंतर दोन दिवसांनी आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. शपथविधी सोहळ्याला येऊन पाठिंबा दर्शवल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले आहेत.
-
पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी काय म्हटलं आहे? “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचे हार्दिक धन्यवाद. आमचं सर्व मंत्रिमंडळ आंध्र प्रदेशच्या विकासासाठी समृद्धीसाठी आणि चांगल्या भविष्यासाठी कटिबद्ध आहे. आपण एकत्र येऊन लोकांच्या इच्छा स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू आणि आपल्या देशाच्या विकासामध्ये योगदान देऊ”, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
-
(सर्व फोटो एकनाथ शिंदे या फेसबूक पेजवरून साभार)

शनीदेव घेऊन आले सुखाचे दिवस; मकर राशीची साडेसाती संपताच ‘या’ तीन राशींना गडगंज श्रीमंतीचे सुख लाभणार