-
ईशान्येकडील सिक्कीम राज्याला संततधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. पाऊस आणि भूस्खलनाच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये आतापर्यंत ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (PTI Photo)
-
मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे अनेक घरे आणि मालमत्तेचे नुकसान झाले असून अनेक भागात संपर्क, वीज, अन्नपुरवठा आणि मोबाईल नेटवर्क यासारख्या मुलभूत गोष्टीही विस्कळीत झाल्या आहेत. (PTI Photo)
-
पूर्व सिक्कीममधील डिक्चू येथील संपूर्ण रस्ता उखडून गेला आहे. अनेक घरांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर दक्षिण सिक्कीममधील लिंगी-प्योंगला जोडणारा मुख्य रस्ता पावसामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. (PTI Photo)
-
तीस्ता नदी सतत धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. त्यामुळे नदीकिनारी राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रत्येक घरामध्ये नदीच्या पाण्याने प्रवेश केला आहे, एवढेच नाही तर काही काही घरांमध्ये नदीची वाळूही शिरली आहे. (PTI Photo)
-
त्याचप्रमाणे सिक्कीमच्या पर्यटन आणि नागरी उड्डाण विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार दरड कोसळल्यामुळे १५ परदेशी नागरिकांसह १२०० हून अधिक पर्यटक त्या ठिकाणी अडकले आहेत. यामध्ये थायलंडमधील २ नेपाळमधील ३ आणि बांगलादेशातील १० पर्यटकांचा समावेश असल्याचा अंदाज आहे. (PTI Photo)
-
सिक्कीम राज्य प्रशासन पर्यटकांना वाचवण्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहे. प्रशासनाने लष्कराची मदत घेण्याचाही ठराव मांडला आहे मात्र खराब हवामानामुळे सध्या तरी विमानसेवेने मदत करणे शक्य नसल्याचे सांगितले जात आहे. (PTI Photo)
-
अतिशय भीषण खराब स्थितीमुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे पर्यटकांना मदतीसाठी एअरलिफ्टिंग शिवाय दुसरा पर्याय नसल्याचे स्पष्ट झाले आहे, त्याचवेळी प्रशासन संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवणे. (PTI Photo)
-
सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनानंतर परिस्थितीचा आढावा घेतला त्यासाठी त्यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली. (PTI Photo)
-
मुख्यतः डोंगराळ भागात वसलेलं राज्य सिक्कीम भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहे राज्यातील सर्व बचाव अधिकाऱ्यांनी भूस्खलनात अडकलेल्या पर्यटकांना आहे त्या ठिकाणी थांबण्याचा कोणताही धोका न पत्करण्याचा सल्ला दिला आहे. (PTI Photo)
पिंपरी-चिंचवड अन् भोवतालच्या पाच किलोमीटर परिसरातील शेकडो गृहप्रकल्प अडचणीत