-
काल (१६ जून) देशभरात गंगा दसरा साजरा केला गेला. हरिद्वार ते काशीपर्यंत लाखो भाविकांनी गंगा दसऱ्याच्या मुहूर्तावर गंगा नदीत स्नान केले. (एएनआय फोटो)
-
हिंदू दिनदर्शिकेनुसार, गंगा दसरा दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमीला साजरा केला जातो. हिंदू धर्मात गंगा दसऱ्याला खूप महत्त्व आहे. (एएनआय फोटो)
-
गंगा दसऱ्याबद्दल असे म्हटले जाते की या दिवशी भगीरथाच्या तपश्चर्येनंतर माता गंगा पृथ्वीवर अवतरली होती. तेव्हापासून दसऱ्याला गंगा मातेची पूजा करून तिच्यात श्रद्धेने स्नान करण्याची वर्षानुवर्षांची परंपरा आहे. (एएनआय फोटो)
-
जुन्या मान्यतेनुसार गंगा दसऱ्याला गंगेत स्नान केल्याने देव प्रसन्न होतात. या दिवशी, भक्त गंगा नदीत उभे राहून गंगा स्तोत्राचे पठण करतात आणि त्यांच्या पापांपासून मुक्त होण्यासाठी गंगा मातेची प्रार्थना करतात. (एएनआय फोटो)
-
यासोबतच लोक कुटुंबात सुख, समृद्धी आणि आशीर्वाद मिळावेत यासाठी धार्मिक विधी करतात. लोकांचा असा विश्वास आहे की गंगा दसऱ्याच्या दिवशी गंगास्नान केल्याने मानसिक शांती तर मिळतेच पण जीवनातील संकटेही दूर होतात. (एएनआय फोटो)
-
अशा परिस्थितीत रात्री उशिरापासूनच देशातील विविध राज्यांतून भाविक गंगाघाटावर पोहेचले. यावेळी हरिद्वार, प्रयागराज, वाराणसी आणि पाटणासह अनेक तीर्थक्षेत्रांच्या गंगा घाटांवर प्रचंड गर्दी दिसून आली. (एएनआय फोटो)
-
यंदा दशमी तिथी १५ तारखेला रात्री उशिरा २.३४ वाजता सुरू झाली तर १७ तारखेच्या सकाळपर्यंत राहीली. (एएनआय फोटो)
-
दरम्यान गंगा ही भारतातील एकमेव नदी आहे जी उत्तराखंडमधील गंगोत्री येथून उगम पावते तर भारतातील उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधून वाहते. (एएनआय फोटो)
(हे पण वाचा: PHOTOS : अपघात टाळण्यासाठी भारतीय रेल्वेनं विकसित केलेली ‘कवच’ प्रणाली काय आहे? जाणून…)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल