-
भारताचे रेल्वे जाळे हे आशियातील सर्वात मोठे आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वे जाळे आहे.
-
देशामध्ये मोठ्या संख्येने लोक रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य देतात.
-
त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत अतिशय जागरूक राहणे आणि त्यांच्या सुरक्षित प्रवासाची काळजी घेणे हे रेल्वे प्रशासनाचे प्राधान्याने केले जाणारे काम आहे.
-
भारतामध्ये रेल्वेचे जाळे पसरण्यास सुरुवात झाल्यापासूनच शून्य अपघाताच्या दृष्टीने विविध पाऊले उचलली गेली आहेत.
-
त्यापैकीच एक आहे ‘रेल्वे कवच’ यंत्रणा. ही यंत्रणा कशी काम करते ही यंत्रणा म्हणजे नेमकं काय याबद्दल आपण जाणून घेऊया.
-
आज झालेल्या पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघातानंतर पुन्हा एकदा रेल्वे प्रवासाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. (ANI)
-
दरम्यान, एक वर्षांपूर्वी ओडिशा मधील बालासोरमध्येही मोठा भीषण रेल्वे अपघात झाला होता त्यामध्ये अनेक निष्पाप प्रवाशांचा बळी गेला होता.
-
मुख्यतः एका वेळेला विविध रेल्वे रुळावरून धावत असतात त्यांची एकमेकांना धडक होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेली एक प्रणाली म्हणजेच कवच प्रणाली आहे. (ANI)
-
२०२२ मध्ये ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (ATP) प्रणालीची पहिली चाचणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतली. या प्रणालीला रेल्वेचा अपघात होण्यापासून वाचवणारी प्रणाली म्हणजेच ‘कवच’ म्हटले जाते. ही संरक्षण प्रणाली पूर्णपणे स्वदेशी आहे. भारतीय रेल्वेच्या रीसर्च डिझाईन अँड स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशनने ही संरक्षणप्रणाली विकसित केली आहे.
-
२०१२ पासून या संरक्षण प्रणालीवर अभियंताकडून काम सुरू होते. त्यावेळी ट्रेन कॉलिजन ॲडव्हान्स सिस्टम (TCAS) असे या प्रकल्पाचे नाव होते. यामागे रेल्वे अपघातांची संख्या शून्यावर आणण्याचे भारतीय रेल्वेचे ध्येय आहे. (ANI)
-
TCAS प्रणाली ची पहिली चाचणी २०१६ ला करण्यात आली. त्यानंतर आणखी नवे सुधार करून २०२२ मध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘कवच प्रणाली’ म्हणून त्याची पुन्हा एकदा सुरुवात केली.
-
कवचप्रणालीनुसार लोको पायलट वेगमर्यादेनुसार मेल-एक्स्प्रेस गाड्यांवर नियंत्रण ठेवू शकला नाही, तर कवचप्रणाली कार्यरत होऊन रेल्वे गाडीतील ब्रेक यंत्रणा सक्रिय होते आणि तात्काळ गाडी थांबते. यामुळे समोरासमोर येणाऱ्या किंवा मागून येणाऱ्या गाड्यांची टक्कर टळते. रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर थेट निरीक्षण ठेवणे, रेल्वे फाटकाजवळून जाताना स्वयंचलित शिटी वाजणे, आपत्कालीन परिस्थितीत संदेश देणे, लाल सिग्नल ओलांडण्यापासून रोखण्याचे काम ही कवच यंत्रणा करते. एखाद्या मार्गावर, रेल्वे गाडीत, रूळ आणि सिग्नलमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येते.
-
एकाच ट्रॅकवर धावणाऱ्या दोन वेगवेगळ्या रेल्वेंवर तंत्रज्ञानाद्वारे नजर ठेवणे आणि त्यांना एकमेकांच्या हालचालींबाबत संदेश पोहोचवणे, हे या प्रणालीचे मुख्य काम आहे. जर एखादी रेल्वे चुकून सिग्नल तोडून पुढे निघाली, तर त्याच मार्गावरील इतर रेल्वे पाच किमी अंतरावर आपोआपच थांबविल्या जातात. म्हणून या यंत्रणेला ‘कवच’ असे समर्पक नाव देण्यात आलेले आहे. दुर्दैवाने भारतात सर्वच ठिकाणी ही यंत्रणा अद्याप बसविण्यात आलेली नाही. रेल्वेच्या काही विभागातच ही प्रणाली कार्यरत आहे.
-
अपघात रोखण्याच्या उद्दिष्टाने तयार केलेल्या कवचाची सिकंदराबाद येथे प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली लोको पायलट आणि चाचणीसाठी इतर अधिकारी उपस्थित होते.
-
(सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित) हे ही पाहा- West Bengal Train Accident : प. बंगालमध्ये भयंकर रेल्वे अपघात; युद्धपातळीवर बचावकार्…

सुवर्णसंधी; पशुधन महामंडळात मोठी भरती; दहावी उत्तीर्ण ते पदवीधर…