-
लोकसभा निवडणुकीत पुण्याचे भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा विजय झाला आहे, त्यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला.
-
महायुतीला बिनशर्त पाठींबा दिल्यांनतर राज ठाकरेंनी मनसेच्यावतीने महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला होता.
-
त्यासाठी राज ठाकरेंनी राज्यातील विविध उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतल्या होत्या.
-
मनसे अध्यक्ष राज यांनी नारायण राणे, मुरलीधर मोहोळ, श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के यांच्यासाठी सभा घेतल्या.
-
त्यामुळे निवडून आल्यानंतर सर्वच उमेदवारांनी राज ठाकरेंच्या सदिच्छा भेटी घेण्यास सुरुवात केली होती.
-
परंतु पुण्याचे नवनिर्वाचित खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आत्तापर्यंत भेट घेतली नव्हती.
-
मात्र काल २१ जून रोजी मोहोळ यांनी राज ठाकरेंची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. त्यांच्यासह इतर सहकारीही उपस्थित होते.
-
मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी निवडणुकीतील सहकार्यासाठी आभार मानण्यासाठी ही भेट घेतली आहे. याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्टही लिहिली आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मुंबई येथील शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राजसाहेबांशी विविध विषयांवर संवाद साधला आणि राजसाहेबांचे धन्यवाद व्यक्त केले. तसेच त्यांनी पुढील वाटचालीस दिलेल्या शुभेच्छाही स्विकारल्या.” असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.

…अन् क्षणात गमावले तब्बल ६१ लाख! मराठी अभिनेत्याची फसवणूक; ‘ती’ गोष्ट पडली महागात, नेमकं प्रकरण काय?