-
देशात सध्या यूजीसी नेट आणि नीट परिक्षेतील गोंधळाचा मुद्दा पेटला आहे. विध्यार्थी विविध ठिकाणी आंदोलने करताना दिसत आहेत.
-
राजकीय पुढारीही या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि शिक्षण विभागाला घेरताना दिसत आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतीच या विषयावर एक पत्रकार परिषद घेतली होती. -
राज्यात इंजिनियरिंग, मेडिकल आणि फार्मसी यासारख्या अभ्यासक्रमांसाठी घेतली जाणारी प्रवेशपूर्व परिक्षा सीईटीमध्ये गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. परिक्षेत झालेल्या गोंधळामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यासाठी शिवसेना नेते (उबाठा) आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट घेतली आहे.
-
या भेटीमध्ये आदित्य यांनी राज्यपाल रमेश बैस यांना एक निवेदन दिले आहे.
-
काय आहे निवेदनात?
-
आदित्य ठाकरेंनी राज्यपालांना दिलेल्या मुख्यतः ४ मागण्या केल्या आहेत.
-
१) विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका खुल्या करायला हव्यात.२) फक्त पर्सेंटाईल नव्हे, तर विद्यार्थ्यांचे गुण जाहीर करायला हवेत.
-
३) पर्यायांमधील ५४ चुकांसाठी पेपर सेट करणाऱ्यांना जबाबदार धरायला हवे. ४) ज्यांनी १४२५ आक्षेप घेतले आहेत त्यांना पूर्ण परतावा मिळायला हवा.
-
याशिवाय मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचीही राज्यपालांकडे विनंती करण्यात आली असल्याची माहिती, आदित्य ठाकरेंनी या भेटीनंतर केलेल्या ट्वीटमधून दिली आहे. (All Photos- ShivSena Social Media) हेही पहा- PHOTOS : पावसात भिजण्याची मजा घ्यायला मुंबईकर पोहोचले मरीन ड्राईव्हवर! पाहा फोटो

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला धक्का; चीनच्या वस्तूंवर लादला १०४ टक्के आयात कर, ‘व्हाईट हाऊस’कडून मोठी घोषणा