-
१८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाचा काल पहिला दिवस होता. दिवसाची सुरुवात नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधी सोहळ्याने झाली, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही खासदार सदस्य म्हणून शपथ घेतली. छायाचित्रात केंद्रीय मंत्री आणि टीडीपी खासदार किंजरापू राम मोहन नायडू १८ व्या लोकसभेसाठी सदस्य म्हणून शपथ घेत आहेत. (PTI)
-
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजप नेते भर्तृहरी महताब यांना लोकसभेच्या हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ दिल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी संसद सदस्य म्हणून शपथ घेतली. छायाचित्रात, पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसद भवन परिसरात माध्यमांशी संवाद साधताना. (PTI)
-
त्यानंतर सर्व मंत्रीमंडळाला हंगामी अध्यक्षांनी शपथ दिली. उर्वरित नवनिर्वाचित खासदार सदस्यांना आसामपासून राज्यांच्या नावाप्रमाणे वर्णमाला क्रमाने शपथ दिली. चित्रात, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि इतर इंडिया आघाडीचे नेत्यांनी संसद भवनात अधिवेशनादरम्यान भारतीय संविधानाच्या प्रती दाखवल्या. (PTI)
-
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतरचे हे पहिले अधिवेशन आहे. देशात लोकसभा निवडणुका एप्रिल ते जून या महिन्यात एकूण ७ टप्प्यात पार पडल्या. (PTI)
-
इंडिया आघाडीने २३४ जागा जिंकल्या, त्यापैकी काँग्रेसने ९९ जागा जिंकल्या. छायाचित्रात, संसद भवन संकुलात काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल. (PTI)
-
काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी एनडीए सरकारच्या पहिल्या १५ दिवसात घडलेल्या १० समस्यांची यादी केली, ज्यात ओडीशातील भीषण रेल्वे अपघात, काश्मीरमधील दहशतवादी हल्ले आणि ट्रेनमधील प्रवाशांची दुर्दशा यांचा समावेश आहे. छायाचित्रात, समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव आणि काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल. (पीटीआय)
-
राहुल गांधी म्हणाले की, “नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारकडून संविधानावर केला जाणारा हल्ला आम्हाला मान्य नाही आणि आम्ही त्याला कोणत्याही परिस्थितीत विरोध करू.” छायाचित्रात, केंद्रीय मंत्री आणि टीडीपी खासदार किंजरापू राम मोहन नायडू सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेत आहेत. (PTI)
-
इंडिया आघाडीने संविधानाच्या प्रती घेऊन संसद संकुलात एकत्र जमून दाखवले की ते “संविधानाचे रक्षण करतील आणि कोणत्याही शक्तीला हात लावू देणार नाहीत.” छायाचित्रात, सोमवार, २४ जून, २०२४ रोजी नवी दिल्लीत, १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसद भवन संकुलात केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार गिरीराज सिंह आणि काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल. (PTI)
-
शपथविधी दोन दिवस सुरू राहण्याची शक्यता असून, त्यानंतर नवीन सभापती निवडणूक घेतली जाईल. पहिल्या दिवशी संसद भवन संकुलात भाजप खासदार रवी किशन हे छायाचित्रात दिसत आहेत. (PTI)
-
दुसऱ्या दिवशी, राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील, अशा प्रकारे अधिवेशनाचे औपचारिक उद्घाटन करतील. चित्रात, टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, २४ जून २०२४ रोजी नवी दिल्लीत संसद भवन संकुलात पक्षाच्या खासदारांची छायाचित्रे घेतली. (PTI)
-
अधिवेशनादरम्यान पंतप्रधान मोदी त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचीही दोन्ही सभागृहांमध्ये ओळख करून देतील. छायाचित्रात, १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसद भवन संकुलात केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नितीन गडकरी. (PTI)
-
संविधानाचे रक्षण करण्याची शपथ विरोधकांनी घेतली आहे. छायाचित्रात, आई रीना पासवान आणि इतरांसह केंद्रीय मंत्री आणि एलजेपी (रामविलास) खासदार चिराग पासवान दिसत आहेत. (PTI)
-
संध्याकाळी राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी सोहळ्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे. पहिल्या दिवशी संसद भवन संकुलात भाजपा खासदार अनुराग ठाकूर हे छायाचित्रात. (PTI)
-
टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांच्याकडे पहिल्या दिवशी संसद भवन संकुलात भारतीय संविधानाची प्रत दिसत आहे. (PTI)
-
पहिल्या दिवशी संसद भवन संकुलात भाजप खासदार ओम बिर्ला. (PTI)
-
१८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसद भवन संकुलात काँग्रेस खासदार प्रभा मल्लिकार्जुन. (PTI)
-
पहिल्या अधिवेशनात पहिल्या दिवशी काँग्रेस खासदार कोडीकुन्नील सुरेश यांनी सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेतली. (PTI)

Pahalgam Terror Attack: “हे दहशतवादी फार काळजीपूर्वक…”, काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या पाठलागाचा थरार; ५ दिवसांत ४ वेळा ठावठिकाणा लागला पण…