-
मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांची सध्या जगभर चर्चा होत आहे. त्यांच्यावर जादूटोणा केल्याप्रकरणी एका मंत्र्याला अटक करण्यात आली आहे. या कॅबिनेट मंत्र्याबद्दल जाणून घेऊयात.
-
कोणी केला जादूटोणा ?
मुइज्जू सरकारच्या अटक करण्यात आलेल्या कॅबिनेट मंत्री फातिमा शमनाज अली सलीम असून त्यांच्यासह दोन लोकांना जादूटोणा करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्यामधील एकजण फातिमा यांचा भाऊ आहे. -
कोण आहेत फातिमा शमनाज अली?
फातिमा शमनाज अली या सलीम मुइज्जू सरकारमध्ये पर्यावरण मंत्री आहेत. अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर केले गेले. न्यायालयाने फातिमाना सात दिवसांची कोठडी सुनावली आहे. -
राष्ट्रपती कार्यालयात काम केले आहे
फातिमा शमनाज यापूर्वी माले सिटी कौन्सिलमध्ये हेनविरू साऊथच्या कौन्सिलर होत्या. एप्रिलमध्ये त्यांना मुइज्जू सरकारमध्ये पर्यावरण मंत्री करण्यात आले. याआधी त्यांनी राष्ट्रपती कार्यालयातही महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. -
पती मुज्जू आणि पत्नीच्या जवळचा आहे
तीन मुलांची आई असलेल्या फातिमा शमनाज अली सलीमने अलीकडेच तिचा पती ॲडम रमीझपासून घटस्फोट घेतला आहे. ॲडम रमीझ हा मुईज्जू आणि त्यांच्या पत्नीचा निकटवर्तीय असून तो मालदीवमध्ये वरिष्ठ अधिकारी राहिला आहे. मात्र, त्यालाही आता निलंबित करण्यात आले आहे. -
तिला राष्ट्रपतींवर काळी जादू का करायची होती?
राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्यावर जादूटोणा करून फातिमा शमनाज यांना महत्त्वाचे पद मिळवायचे होते, असा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. यासोबतच असंही म्हटलं जात आहे की, काही काळापूर्वी शमनाजने मुइज्जूच्या पत्नीचा एक व्हिडिओ लीक केला होता ज्यामध्ये ती एका पबमध्ये नाचताना आणि गाताना दिसत होती. अशा परिस्थितीत बदला घेण्यासाठी मुइज्जू पती- पत्नीने फातिमा शमनाजला या प्रकरणात गोवले असल्याचे बोलले जात आहे. -
मालदीवमधील काळ्या जादूची (जादूटोणा) प्रकरणे
मालदीवमध्ये लोक काळ्या जादूला किंवा जादूटोण्याला फंडिता किंवा शिहिरू म्हणतात. मालदीवमध्ये काळ्या जादूबाबत (जादूटोणा) २०१५ मध्येही इशारा देण्यात आला होता. देशातील काळ्या जादूची वाढती प्रकरणे पाहता लोकांनी यापासून दूर राहावे अन्यथा परिणाम भयंकर होतील, असे सरकारने म्हटले होते. -
छाप्यात काळ्या जादूच्या वस्तू सापडल्या
मालदीव पोलिसांनी फातिमाच्या घरावर छापा टाकून अनेक आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या आहेत. याचा वापर तिने या जादूटोण्यासाठी केल्याचे सांगितले जात आहे. हेही वाचा- PHOTOS : पंतप्रधानांना भेटल्या दोन छोट्या पाहुण्या, ऐकवली कविता; मोदी म्हणाले ‘वाह’! वाचा काय घडलं?
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच