-
समाजवादी पक्षाचे नेते आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांची पत्नी डिंपल यांचा एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये दोघेही त्यांच्या पक्षाच्या खासदारांसोबत संसदेच्या पायऱ्यांजवळ उभे असल्याचे दिसत आहे. (पीटीआय)
-
यादरम्यान दोघेही एकमेकांशी बोलताना हसायला लागतात. अखिलेश यादव आणि डिंपल यादव यांचा हा अंदाज चाहत्यांना खूप भावला आहे. या दोघांच्या मालमत्तेबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्याकडे लखनौ ते सैफईपर्यंत करोडोंची मालमत्ता आहे. (पीटीआय)
-
आधी आपण अखिलेश यादव यांच्यापासून सुरुवात करूया. myneta.info वेबसाइटनुसार, अखिलेश यादव यांची एकूण संपत्ती ४२ कोटी रुपये असून त्यांच्यावर ९९ लाख रुपयांचे कर्जही आहे. (पीटीआय)
-
डिंपल यादव यांच्याकडेही अशीच संपत्ती आहे. myneta.info वेबसाइटनुसार, डिंपल यादव ४२ कोटींच्या संपत्तीच्या] मालकीण आहेत. (पीटीआय)
-
अखिलेश यादव आणि डिंपल यादव यांच्या नावावर वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ९ कोटी रुपये जमा आहेत. (पीटीआय)
-
डिंपल यादव यांच्याकडे ५९ लाख रुपयांचे सोने, हिरे आणि मोत्याचे दागिने आहेत. (पीटीआय)
-
सैफईमध्ये डिंपल यादव आणि अखिलेश यांच्या नावावर ३ शेतजमिनी आहेत ज्यांची किंमत ९ कोटींहून अधिक आहे. (पीटीआय)
-
याशिवाय लखनऊ आणि सैफईमध्ये या दोघांच्या नावावर अनेक बिगरशेती जमिनी, व्यावसायिक इमारती आणि निवासी घरे आहेत ज्यांची किंमत १८ कोटी २१ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. (पीटीआय) हेही पहा- PHOTOS : चार पत्नी, १२ मुलं… एलॉन मस्क यांचा मोठा परिवार, वाचा कोण कुठे काय करत आहे?
पोटच्या मुलाला वाचवण्यासाठी आईनं केले थेट आगीशी दोन हात; आता मृत्यूशीही झुंज सुरू!