-
बाहुबली हा चित्रपट भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील मैलाचा दगड मानला जातो. नेत्रदीपक व्हिज्युअल इफेक्ट्स, रोमांचक कथा आणि उत्कृष्ट अभिनयामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. एस. एस. राजामौली दिग्दर्शित या चित्रपटाने भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रचंड लोकप्रियता मिळवली.
-
पण ‘बाहुबली’ चित्रपटात अभिनेत्यांऐवजी प्रसिद्ध भारतीय राजकारणी असते तर ते कसे दिसले असते याची तुम्ही कधी कल्पना केली आहे का?
-
एका इंस्टाग्राम युजरने ‘बाहुबली’ च्या कलाकारांच्या जागी प्रसिद्ध राजकारण्यांचे चेहरे लावले आहेत. एआय या तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केलेली ही छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
-
या छायाचित्रात तुम्ही साऊथ अभिनेता प्रभासऐवजी लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी बाहुबलीच्या भूमिकेत असल्याचे पाहू शकता.
-
या छायाचित्रात ममता बॅनर्जी राजमाता शिवगामीच्या भूमिकेत दिसत आहेत. त्याचवेळी निर्मला सीतारामन, अमित शहा, रामदास आठवले हे देखील चित्रात वेगवेगळ्या भूमिकेत दिसत आहेत.
-
एआय ने तयार केलेल्या देवसेनाच्या भूमिकेतील सोनिया गांधींचे हे छायाचित्र चाहत्यांना खूपच आवडले आहे.
-
त्याच वेळी, कट्टप्पाच्या पात्रात एआयने तयार केलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या छायाचित्रावर नेटकरी विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
-
चित्रपटातील इतर पात्रांनाही एआय तंत्रज्ञानाने तयार केले आहे, तेही पाहूयात.
-
चिराग पासवान, लोक जनशक्ती (रामविलास) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष
-
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
-
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव
-
अखिलेश यादव यांच्या पत्नी आणि उत्तर प्रदेशातील मैनपुरीच्या खासदार डिंपल यादव.
-
असदुद्दीन ओवेसी, ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे प्रमुख
-
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
-
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग
(All Photos: @sahixd/instagram)
(PHOTOS : चार पत्नी, १२ मुलं… एलॉन मस्क यांचा मोठा परिवार, वाचा कोण कुठे काय करत आहे? )
![Natasa Shares Cryptic Video As Hardik Pandya Returns](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/07/hardik_natasha.jpg?w=300&h=200&crop=1)
हार्दिक पंड्याची पत्नी नताशाने टीम इंडिया भारतात येताच केलेली पोस्ट पाहून घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; लिहिलं, “तेव्हा माझं रक्षण..”