-
हैदराबाद हे भारतातील प्रसिद्ध अशा सर्वात महत्वाच्या शहरांपैकी एक शहर आहे. हैदराबाद ही आतापर्यंत तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांची राजधानी होती. (Photo Source: Pexels)
-
फेब्रुवारी २०१४ मध्ये आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगणाची निर्मिती करण्याचे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. (Photo Source: Andhra Pradesh Tourism/Facebook)
-
यानंतर २ जून २०१४ रोजी आंध्र प्रदेशपासून वेगळे होऊन तेलंगणा हे २९ वे राज्य बनले. यासोबतच हैदराबादला १० वर्षांसाठी दोन्ही राज्यांची सामायिक राजधानी बनवण्यात आले. (Photo Source: Andhra Pradesh Tourism/Facebook)
-
परंतु, २०१४ च्या आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्यामुळे, २ जून २०२४ पासून हैदराबाद ही तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची सामायिक राजधानी राहणार नाही. (Photo Source: Andhra Pradesh Tourism/Facebook)
-
या कायद्याच्या कलम ५(१) नुसार, हैदराबादला २०१४ पासून पुढील १० वर्षांसाठी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाची संयुक्त राजधानी बनवण्यात आले. (Photo Source: Andhra Pradesh Tourism/Facebook)
-
या कायद्याच्या कलम ५(२) मध्ये असे म्हटले आहे की १० वर्षांनंतर
हैदराबाद फक्त तेलंगणाची राजधानी राहील आणि आंध्र प्रदेशची नवीन राजधानी केली जाईल. (Photo Source: Andhra Pradesh Tourism/Facebook) -
मात्र आंध्र प्रदेशच्या राजधानीवर अद्याप एकमत झालेले नाही. अमरावती आणि विशाखापट्टणमला आंध्र प्रदेशची राजधानी करण्यावरून सध्या न्यायालयात लढा सुरू आहे.
(Photo Source: Pexels) (हे पण वाचा:PHOTOS : जगातील सर्वात उंच रेल्वे पूल भारतात; पाहा ‘चिनाब रेल्वे ब्रिज’ची ही अद्भुत छ… )
Shiv Jayanti 2025 Wishes : शिवजयंतीच्या द्या प्रियजनांना खास शुभेच्छा; वाचा, एकापेक्षा एक सुंदर व हटके मेसेज