-
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आज कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे. त्यांचा मन्नत हा बंगला मुंबईतील सर्वात महागड्या मालमत्तांपैकी एक आहे. आजघडीला मन्नतमध्ये अनेक आलिशान आणि महागड्या गाड्या उभ्या आहेत. पण एक वेळ अशी आली होती की शाहरुख खानकडे ईएमआय भरण्यासाठीही पैसे नव्हते आणि त्याची एकमेव आवडीची कार त्याच्याकडून हिसकावून घेण्यात आली. (Indian Express)
-
शाहरुख खानसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या जुही चावलाने हा खुलासा केला आहे. जुही शाहरूखची बिझनेस पार्टनरही आहे. दोघांनी २००० साली एक प्रोडक्शन हाऊसही सुरू केले होते. यासोबतच जुही चावला ही आयपीएल टीम कोलकाता नाइट रायडर्समध्ये शाहरुख खानची पार्टनर आहे. (Indian Express)
-
गुजरात चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या एका इव्हेंटमध्ये जुही चावलाने सांगितले की, शाहरुख खानच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती की त्याच्याकडे ईएमआय भरण्यासाठी पैसे नव्हते आणि त्यामुळे त्याकाळी त्याच्याकडे असलेली एकुलती एक गाडी खेचून नेण्यात आली होती. (Indian Express)
-
जुही चावलाने सांगितले की, त्यावेळी शाहरुख खानचे मुंबईत घर नव्हते आणि तो कामासाठी दिल्लीहून यायचा. तो युनिट (फिल्म क्रू) सोबत चहा प्यायचा, त्यांच्यासोबत जेवायचा आणि युनिटशी त्याचे खूप चांगले संबंध होते. (Indian Express)
-
सुरुवातीच्या काळात शाहरुख खान २-३ शिफ्टमध्ये काम करायचा. जुही चावलाने सांगितले की, शाहरुख खानकडे खूप प्रेरणाशक्ती होती. तो नेहमी मोटीवेट राहायचा. (Indian Express)
-
दरम्यान, जुही चावलाने सांगितले की, शाहरुख खानकडे असलेली काळी जिप्सी गाडी एके दिवशी खेचून नेण्यात आली. शाहरुख ईएमआय (हप्ते) भरू शकला नव्हता म्हणून हे घडले होते. (Indian Express)
-
अभिनेत्रीने सांगितले की, जेव्हा शाहरुख खानला झालेला प्रकार समजला तेव्हा तो सेटवर खूप निराश झाल्याचे पाहिले होते, त्याला सांत्वना देण्यासाठी मी त्याला म्हणाले, काळजी करू नकोस एक दिवस तुझ्याकडे खूप गाड्या असतील आणि हे त्याला अजूनही आठवते. (Indian Express)
-
आज शाहरुखकडे Rolls Royce Cullinan Black Badge, Rolls Royce Phantom, Bentley Continental GT, BMW 7 Series, BMW i8 Sports Car, BMW 6 Series Convertible, Land Rover’s Range Rover SUV, Toyota Land Cruiser आणि Are8 सारख्या अनेक लक्झरी कार आहेत . (Indian Express)
-
याशिवाय किंग खानकडे व्होल्वो BR9 लक्झरी व्हॅनिटी व्हॅन आहे. तिची किंमत सुमारे ४ कोटी रुपये आहे. (Indian Express) हेही वाचा- PHOTOS : १७ वर्षांनंतर तब्बूने केला खुलासा; ‘या’ हिट गाण्यातील कॅमिओसाठी शाहरुख खानने सर्व स्टार्सना दिले होते महागडे गिफ्ट!
![prateik babbar did not invite family for wedding](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/prateik-babbar-did-not-invite-family-for-wedding.jpg?w=300&h=200&crop=1)
प्रतीक बब्बरने लग्नात वडिलांनाही बोलावलं नाही; सावत्र भावाने व्यक्त केली नाराजी, म्हणाला, “आमचं आयुष्य…”