-
सध्या तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार कल्याण बॅनर्जी चर्चेत आहेत. त्यांनी संसदेतील भाषणात केलेल्या कृतीने त्यांची सर्वत्र चर्चा होत आहे. त्यामुळे यानिमिताने त्यांच्याकडील मालमत्तेचीही माहिती जाणून घेऊया. (@Kalyan Banerjee/FB)
-
भाजपाच्या चारशे पारच्या घोषणेची खिल्ली उडवत कल्याण बॅनर्जी यांनी ‘चु कित कित’ या लहान मुलांच्या खेळाचा उलेख केला. (इतर राज्यात खेळला जाणारा खेळ) ते म्हणाले, “निवडणुकीच्या वेळी अबकी बार चारसौ पार अशी घोषणा दिली होती. ‘चु कित कित’ खेळ सुरू झाला होता. हाही एक खेळच आहे. आधी ४०० पार म्हणत हे पळाले. पण कित कित कित कित करत शेवटी किती झाले? २४० झाले. त्या खेळातही हरले”, अशी टीका त्यांनी संसदेतील भाषणात भाजपावर केली आहे.
-
कल्याण बॅनर्जी हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सर्वात जुन्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात. १९९८ पासून ते तृणमूल काँग्रेस पक्षाशी निगडीत आहेत. संसदेत येण्यापूर्वी ते २००१ ते २००६ या काळात विधानसभेचे सदस्य होते.
-
२००१ मध्ये ते पहिल्यांदा आसनसोल उत्तर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. मात्र, २००६ मध्ये ते येथून हरले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कल्याण बॅनर्जी चौथ्यांदा सेरामपूरमधून लोकसभेवर निवडून आले आहेत.
-
कल्याण बॅनर्जी हे सर्वोच्च न्यायालय आणि कलकत्ता उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील आहेत. कलकत्ता हायकोर्टातील अनेक हायप्रोफाईल केसेसमध्ये त्यांनी तृणमूलच्या वतीने युक्तिवाद केला आहे.
-
कल्याण बॅनर्जी यांच्या शिक्षणाबद्दल सांगायचे तर त्यांनी बी.कॉमचा अभ्यास केला आहे. तसेच एलएलबीची पदवी घेतली आहे. . कल्याण बॅनर्जी १९८१ पासून कलकत्ता उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत. त्यांनी रिजवानूर रहमान प्रकरण, नंदीग्राम प्रकरण, छोटा अंगरिया प्रकरण, भिखारी पासवान प्रकरण, सिंगूरमध्ये कलम १४४ लागू करणे आणि भूसंपादनाच्या विविध प्रकरणांमध्ये तृणमूलच्या वतीने खटले लढवले आहेत.
-
myneta.info वेबसाइटनुसार, कल्याण बॅनर्जी यांच्या घरात एक कोटी रुपयांची पुस्तके आहेत. या वेबसाइटनुसार त्यांच्याकडे एकूण ३० कोटी रुपयांची संपत्ती आहे.
-
कल्याण बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नीच्या नावे ५६२,७६,८५० ५ कोटी ६२ लाख ७६ हजार ८५० रुपये विविध बँक खात्यांमध्ये जमा आहेत. त्याचवेळी त्यांनी बॉण्ड्स, डिबेंचर्स आणि शेअर्समध्ये १२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याशिवाय त्यांनी ६ कोटी रुपयांच्या एलआयसी आणि इतर विमा पॉलिसी घेतल्या आहेत.
-
कल्याण बॅनर्जी यांच्याकडे ३,६३,२०,००० रुपयांची मालमत्ता असून त्यात बिगरशेतजमीन आणि निवासी घरांचा समावेश आहे. (हेही वाचा- PHOTOS : भोले बाबा यांच पूर्वाश्रमीचं नाव काय? सत्संगाआधी करायचे ‘हे’ काम! वाचा संपूर्ण माहिती)
![Natasa Shares Cryptic Video As Hardik Pandya Returns](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/07/hardik_natasha.jpg?w=300&h=200&crop=1)
हार्दिक पंड्याची पत्नी नताशाने टीम इंडिया भारतात येताच केलेली पोस्ट पाहून घटस्फोटाच्या चर्चांना उधाण; लिहिलं, “तेव्हा माझं रक्षण..”