-
लोकसभा विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी आज हाथरस येथील चेंगराचेंगरी दुर्घटनेतील पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. (Congress/X)
-
हाथरस चेंगराचेंगरीतील पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेताना काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress/X)
-
राहुल गांधी यांच्या भेटीने पीडितांच्या नातेवाईकांनी आक्रोश केल्याचे यावेळी पाहायला मिळाले. या दुर्घटनेत १२१ निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. यामध्ये बहुसंख्य महिला होत्या. (Congress/X)
-
२ जुलै रोजी भोले बाबा यांच्या संत्संगाच्या कार्यक्रमात हा सर्व दुर्दैवी प्रकार घडला होता. (Photo-X)
-
दरम्यान, याप्रकरणी कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या भोले बाबाच्या संस्थेच्या सहा सदस्यांना पोलीसांनी काल अटक केली आहे. (Congress/X)
-
यानंतर आज हाथरस चेंगराचेंगरीतील पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी अलीगढ आणि हाथरसमध्ये पोहोचल्याचे पाहायला मिळाले. (PTI)
-
राहुल गांधींनी पीडितांना मदतीचं आश्वासन दिलं आहे. (ANI)
-
काँग्रेस पक्ष तुमच्या पाठिशी आहे, आम्ही तुम्हाला मदत करु असं ते म्हणाले आहेत. (Congress/X)
-
राहुल गांधी रुग्णालयात दाखल जखमी लोकांना भेटायलाही गेले. पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Congress/X)

Shruti Chaturvedi : “पुरुष अधिकाऱ्याने माझी तपासणी केली, आठ तास एका खोलीत…”, भारतीय उद्योजिकेने सांगितली अमेरिकन विमानतळावरील आपबिती