-
देशातील सर्वात मोठ्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. १२ जुलै रोजी अनंत आणि राधिकाचे लग्न होणार आहे.
-
राधिका मर्चंट ही अनंतची मैत्रीण आणि अंबानी कुटुंबाचे निकटवर्तीय वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. वीरेन मर्चंट यांचाही अब्जाधीश उद्योगपतींमध्ये समावेश होतो, पण त्यांना माध्यमांच्या चर्चेत राहणे आवडत नाही तसेच ते गरजेपेक्षा जास्त प्रसिद्धीत राहणेही टाळतात.
-
वीरेन मर्चंट हे एनकोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ आहेत. याशिवाय फोर्ब्सनुसार, वीरेन अनेक मोठ्या कंपन्यांचे संचालकही आहेत.
-
या मोठ्या कंपन्यांमध्ये एन्कोर बिझनेस सेंटर प्रायव्हेट लिमिटेड, एनकोर नॅचरल पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड, झेडवायजी फार्मा प्रायव्हेट लिमिटेड, साई दर्शन बिझनेस सेंटर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि एनकोर पॉलीफ्रॅक प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वीरेन मर्चंट यांची एकूण संपत्ती ७५५ कोटी रुपये आहे. अनंत अंबानींच्या आधी मुकेश अंबानी यांनी त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि मुलगी ईशा अंबानी यांचे लग्न सुप्रसिद्ध बड्या उद्योगपतींच्या मुलांसोबत केले आहे.
-
अंबानी यांच्या तीनही व्याहांची स्वतःची प्रचंड श्रीमंत आणि प्रतिष्ठित अशी ओळख आहे. चला जाणून घेऊया मुकेश अंबानींच्या इतर दोन व्याह्यांबदल आणि या तिघांपैकी सर्वात श्रीमंत कोण आहे.
-
मुकेश अंबानी यांनी त्यांची एकुलती एक मुलगी ईशा अंबानीचा विवाह पिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामलसोबत केला आहे. पिरामल समूहाचा व्यवसाय ३० हून अधिक देशांमध्ये फार्मा, आरोग्य आणि वित्त क्षेत्रात पसरलेला आहे. फोर्ब्सनुसार, अजय पिरामल यांची एकूण संपत्ती ३.३२ अब्ज डॉलर म्हणजे अंदाजे २६ हजार ८०० कोटी रुपये आहे.
-
याशिवाय, मुकेश अंबानी यांच्या मोठ्या मुलाचे लग्न श्लोका मेहतासोबत झाले आहे. श्लोकाचे वडील अरुण रसेल मेहता ‘रोझी ब्लू’ या डायमंड ज्वेलरी ब्रँडचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. या कंपनीचा व्यवसाय १२ देशांमध्ये पसरलेला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरुण रसेल मेहता यांची एकूण संपत्ती ३ हजार कोटी रुपये आहे. (फोटो – पीटीआय आणि रॉयटर्स)
(हे पण वाचा: PHOTOS : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादवसह ‘या’ खेळाडूंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट! पाहा खास फोटो)
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”