-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न १२ जुलैला आहे. त्यांच्या लग्नाला बॉलीवूडपासून देशातील दिग्गज नेतेही उपस्थित राहणार आहेत. मुकेश अंबानींच्या पाहुण्यांच्या यादीत अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. पाहुया पाहुण्यांच्या यादीत कोणाचा समावेश आहे. (पीटीआय)
-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण, मंत्री नारा लोकेश आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशिवाय अनेक दिग्गज पुढारी उपस्थित राहणार आहेत. (इंडियन एक्सप्रेस)
-
पाहुण्यांच्या यादीत एमके स्टॅलिन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नावाचाही समावेश आहे. (इंडियन एक्सप्रेस)
-
याशिवाय मुकेश अंबानी यांनी देशाचे माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनाही अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला येण्याचे निमंत्रण दिले आहे. (इंडियन एक्सप्रेस)
-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात बॉलीवूड स्टार्सचा मेळा पाहायला मिळणार आहे. यामध्ये सलमान खानपासून शाहरुख खानपर्यंतच्या नावांचा समावेश आहे. (ANI)
-
सलमान खान आणि शाहरुख खान व्यतिरिक्त ज्या बॉलीवूड स्टार्सना आमंत्रित करण्यात आले आहे त्यात अमिताभ बच्चन, आमिर खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, शाहिद कपूर, विकी कौशल, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्याशिवाय इतरही अनेक स्टार्सच्या नावांचा या यादीत समावेश आहे. (ANI)
-
अनंत आणि राधीका यांच्या लग्नात ठाकरे कुटुंब, देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दिसणार आहेत. त्यांच्याशिवाय इतर अनेक दिग्गज नेतेही या सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत. (पीटीआय)
-
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न उद्या १२ जुलै रोजी मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या लग्न सोहळ्यासाठी पारंपारिक ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. (ANI) (हेही वाचा- Anant-Radhika Wedding: पाहा अनंत-राधिकाच्या मेहेंदी सोहळ्यातील बॉलीवूड स्टार्सचे ग्लॅ)
![Vicky Kaushal Rashmika Mandanna Chhaava Movie Review](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/chhaava.jpeg?w=300&h=200&crop=1)
Chhaava Review : नि:शब्द करणारा क्लायमॅक्स, विकी कौशलचा दमदार अभिनय पण, रश्मिका…; ‘छावा’मध्ये ‘या’ गोष्टीची जाणवली कमी