-
काल (१२ जुलै) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी महाराष्ट्र दौऱ्यावर होत्या.
-
यावेळी ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांची तसेच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
-
शरद पवारांच्या भेटीसाठी ममता शरद पवारांच्या मुंबईतील घरी पोहोचल्या.
-
यावेळी त्यांनी शरद पवारांशी बातचीत केली. या भेटीवेळी पवार कुटुंबीय उपस्थित होते. आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार, प्रतिभा पवार हे कुटुंबीय हजर होते.
-
शरद पवार आणि ममता बॅनर्जी
-
पवारांच्या भेटीसह ठाकरे कुटुबियांना सुद्धा ममता बॅनर्जी भेटल्या.
-
उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील मातोश्री निवासस्थानी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांची भेट घेतली.
-
त्यानंतर मातोश्रीवर एक पत्रकार परिषदही झाली, पत्रकार परिषदेत त्यांना केंद्र सरकारच्या आणीबाणी संदर्भातील निर्णयाबाबतही विचारण्यात आलं. यावेळी ममता यांनी मोदी सरकार आल्यापासून देशात आणीबाणी आहे असा टोला केंद्र सरकारला लगावताना त्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रचार करणार असल्याचेही म्हणाल्या आहेत.
-
छायाचित्रात, तेजस ठाकरे, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, रश्मी ठाकरे, आणि आदित्य ठाकरे
(PHOTOS: Mamta Banerjee Facebook Page)
हेही पहा- PHOTOS : सदाभाऊ खोतांची फडणवीसांना मिठी, विधान परिषद निवडणुकीतील महायुतीच्या विजयी उम…

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”